“संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी खासदारकीचा राजीनामा द्या”

शिंदेगटाच्या नेत्याचं संजय राऊतांना आव्हान...

संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी खासदारकीचा राजीनामा द्या
| Edited By: | Updated on: Dec 03, 2022 | 2:35 PM

कोल्हापूर : “खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता पाण्यात बुडवण्याची भाषा करतात.पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही शिवसेना अजून किती बुडवणार आहात? तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात? शिंदे गटातील आमदारांवर राग काढण्याआधी खासदारकीचा राजीनामा द्या”, असं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेगटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी संजय राऊत यांचा पक्षातील वाढत्या हस्तक्षेपावर आक्षेप घेत बंड केलं. या बंडाळीनंतर शिंदेगटातील हे नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवरची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवतात. आता राजेश क्षीरसागर यांनी राऊतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही. माझं पक्ष नेतृत्वाला विचार नाही आमचं काही योगदान नाही का? काही लोक लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करताहेत. गेली अडीच वर्षे सीमा भागासाठी तुम्ही काय केलं? त्यांना जमलं नाही ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय, असंही क्षीरसागर म्हणालेत.

सीमाप्रश्नाच्या बाबतीत कर्नाटककडून चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. यावर कर्नाटक सरकारने विचार केला पाहिजे. प्रशासनाच्या एका चुकीमुळे सीमावादाचा गोंधळ निर्माण झाला. सीमा भागात अन्याय होत असताना स्पष्ट दिसतंय.आमचाच भाग घ्यायचा आणि आमच्याच मंत्र्यांना येऊ नको म्हणायचं हे कितपत योग्य आहे? सीमा प्रश्नाच्या बैठकीत काही गोष्टी ठरत आहेत. हा विषय संपवा, कर्नाटक सरकारला विनंती आहे, असंही क्षीरसागर म्हणाले म्हणाले आहेत.