AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्या लोकांना हजार रुपये देऊन शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नेलंय”, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा त्रागा

Eknath Shinde Dasara Melava : एकनाथ शिंदे यांनी पैसे देऊन लोकांना मेळाव्याला आणल्याचा आरोप शिवसैनिकांनी अनेकदा केला. पण आता त्यांनी काही पुरावे दाखवत शिंदेंवर आरोप केले आहेत.

आमच्या लोकांना हजार रुपये देऊन शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नेलंय, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा त्रागा
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 05, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई : आज शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर होणारा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पैसे देऊन लोकांना मेळाव्याला आणल्याचा आरोप शिवसैनिकांनी अनेकदा केला. पण आता त्यांनी काही पुरावे दाखवत शिंदेंवर आरोप केले आहेत. “आमच्या लोकांना हजार रुपये देऊन शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नेलंय”, असं हे शिवसैनिक (Uddhav Thackeray) म्हणत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी सभेला येण्यासाठी एक हजार रुपये दिल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्याची व्हीडिओ क्लिपही या शिवसैनिकांनी दाखवली.

कोल्हापूरचे शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत आलेत. सभेच्या आधी हे सगळे शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेत. त्यांनी आपल्या भागातील शिवसैनिकाला फोन लावला. त्यांच्यातील संभाषण या शिवसैनिकांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींना ऐकवली.

शिवेसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यावर टीका केली आहे. अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात दानवे यांनी एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका केली आहे. आमचा दसरा मेळावा हा या गद्दारांच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आहे. पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत हे या राक्षसांचा नायनाट झालेला असेल, असं दानवे म्हणालेत.

तर दुसरीकडे निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका केली आहे. चलो शिवाजी पार्क…, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीची टोपी घातलेला एक फोटो शेअर केला आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच