कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता? शेतकऱ्यांचा कौल कुणाला? प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय. उद्या गुरुवारी 1 जुलै रोजी सकाळी आठ वाजलेपासून कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. (Krishna Sugar Mill Election Result)

कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता? शेतकऱ्यांचा कौल कुणाला? प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण
कृष्णा साखर कारखाना

सातारा : कराडचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (Krishna Sugar Mill Election) हा पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याचं कार्यक्षेत्र सातारा, सांगली अशा दोन जिल्ह्यात आहे. 47 हजार 145 एवढी सभासद संख्या आहे. मंगळवारी कृष्णा साखर कारखान्यासाठी निवडणूक पार पडली आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय. (Krishna Sugar Mill Election counting preparations completed by Administration)

कारखाना मोठा आणि सभासद संख्याही मोठी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या राजकारणावर ह्या निकालाचे परिणाम होणार हे निश्चित. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय.

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात

उद्या गुरुवारी 1 जुलै रोजी सकाळी आठ वाजलेपासून कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 74 टेबलवर 325 मतमोजणी अधिकाऱ्यांच्यामार्फत ही मतमोजणी होईल. कारखान्याच्या एकूण 47145 सभासद मतदारांपैकी 34532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

कृष्णाकाठाचा कौल कुणाला?

कोरोनाच्या काळात कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडले आहे. मतदारसंख्येच्या एकूण 91 % मतदान झाले असून कारखान्याचे सभासद कुणाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे. एकूण 47145 मतदारांपैकी सुमारे 34532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 47145 मतदारांपैकी सुमारे नऊ हजार मतदार मयत असल्याने टक्केवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात हयात मतदार विचारात घेतल्यास सुमारे 91 % मतदान झाले. सहकार पॅनेलकडून सत्ताधारी गट सुरेश भोसले आणि अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वात मैदानात होता. तर, माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्त्वात संस्थापक पॅनेल तर डॉ.इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्त्वात रयत पॅनेल निवडणुकीला सामोरं गेलं. कृष्णाकाठावरील शेतकरी सभासदांनी कुणाला कौल दिला हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल.

कोणत्या पॅनलला किती मतदान?

द स्ट्रेलेमा या संस्थेने मतदानानंतर सभासदांशी संवाद साधून निवडणुकीचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या एक्झिटपोलनुसार, या निवडणुकीत सहकार पॅनलला 47-50 टक्के मतं मिळत आहेत. संस्थापक पॅनलला 35-38 टक्के मतं आणि रयत पॅनलला 15-18 टक्के मतं मिळताना दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार सहकार पॅनलला 10-12 टक्क्यांची आघाडी मिळताना दिसत आहे.

कुणाला किती जागा मिळणार?

द स्ट्रेलेमा एक्झिट पोलनुसार कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 जागा सहकार पॅनलकडे जाताना दिसत आहे. संस्थापक पॅनल आणि रयत पॅनलला खातंही खोलता येणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

संबंधित बातम्या:

Exit Poll : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुणाला किती जागा?

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय

(Krishna Sugar Mill Election counting preparations completed by Administration)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI