LIVE : हितेंद्र ठाकुरांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाचं बैठकांचं सत्र सुरु आहे. राजधानी दिल्लीत आजही निवडणूक आयोगाची बैठक होत आहे. येत्या दोन दिवसात निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवसभरातील राजकीय घडामोडी एकाच ठिकाणी : मुंबई : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या […]

LIVE : हितेंद्र ठाकुरांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाचं बैठकांचं सत्र सुरु आहे. राजधानी दिल्लीत आजही निवडणूक आयोगाची बैठक होत आहे. येत्या दोन दिवसात निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.

दिवसभरातील राजकीय घडामोडी एकाच ठिकाणी :

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी, पालघर लोकसभेच्या जागेवर पाठिंब्यासाठी भेटी

सातारा : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार मदनराव भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश, मदनराव भोसले यांचा कार्यकर्त्यासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

बीड : तुम्ही काय घोषणा देताय येड्यांनो – पंकजा मुंडे

बीड – जयदत्त क्षीरसागर यांचं आणि माझं चांगलं जमतं, यामुळे काही जणांच्या पोटात दुखतं – पंकजा मुंडे

“आम्ही बीड जिल्ह्याचा पाया मजबूत केला आहे. मागच्या सरकारच्या काळात मी प्रचार केला तर माझे मणके ढिले झाले, मला मणक्यांचा आजार झाला. पूर्वी देशात रस्त्याच्या बाजूला रांगा लावून लोक बसलेले असायचे पण आता स्वच्छता अभियानामुळे हे चित्र दिसत नाही. सर्वाधिक पीक विमा बीड जिल्ह्याला मिळाला.

पूर्वी सगळे नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते, पण आज ही परिस्थिती नाही, विदर्भ आणि मराठवाड्याला नेतृत्व मिळालं आहे.

आमदार लक्ष्मण पवार यांची उमेदवारी जाहीर करा आशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही काय बिनडोक आहेत का रे? तुम्ही काय घोषणा देताय येड्यांनो” – पंकजा मुंडे

पार्थ पवारांना अद्याप उमेदवारी दिलेली नाही – जयंत पाटील

पार्थ पवार यांना उमेदवारी दिलेली नाही, कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. कुटुंबीयाचं असं काही यात मला वाटत नाही. एखादा कार्यकर्ता काम करत असेल तर त्याचा अर्थ पक्ष फक्त नातेवाईकांना संधी देतो असं नाही – जयंत पाटील.

वाचा: मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी जवळपास निश्चित

नीरव मोदीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

नीरव मोदी जर समजा फिरत असेल तर सरकार किती खोटं बोलतंय हे लक्षात येतं. सरकार कर्ज बुडवून पळवून गेलेल्या लोकांना कसं काय अभय देतंय. मल्ल्या पळाला, नीरव मोदी असा फिरतोय. सरकारला खरेच त्यांना परत आणायचं आहे का?

उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

आमच्यात फार वाद नव्हता. थोडा फार वाद राहणारच. शरद पवार यांना शिवेंद्रराजे भेटले नव्हते तर कार्यकर्ते भेटले होते. त्याला शिवेंद्र राजे किंवा मी जबाबदार नाही. शिवेंद्रराजे आतमध्ये हसत होते. मतभेद काही प्रमाणात होते, मतभेद कुणात नसतात?

शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या पुढे आम्ही कोणीही नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांना समजवावा लागेल. माझ्या निवडणुकीला वेळ आहे. एकत्र काम करायचं असं ठरलेल आहे.

प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडून चेकमेट?

प्रकाश आंबेडकरांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन बी तयार. सपा आणि बसपाला महाआघाडीत घ्यायचा प्रयत्न. महाराष्ट्रात सपा, बसपाला महाआघाडीत आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील. बसपाला २ तर सपाला १ जागा देण्याचा काँग्रेसचा विचार-सूत्र. दलित, मुस्लिम मतांच्या जोगव्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकर यांची आशा आघाडीनं सोडली?

अहमदनगर

अहमदनगरला जिल्हाप्रशासनाकडून आजी माजी आमदारांना झटका, भाजप आमदारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांचे शस्त्र परवाने रद्द, शस्त्राचा भविष्यात गैरवापर होण्याची शक्‍यता असल्याने परवाने रद्द, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय,भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव या सहा जणांचा शस्त्र परवाना जिल्हाधिकार्‍यांनी  केला रद्द

पुणे – प्रवीण गायकवाड-मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

प्रवीण गायकवाड यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट.  प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी देण्याबाबत चाचपणी. काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी मिळू शकते.

 मुख्यमंत्र्यांचं नागपूरमध्ये भाषण

– जलयुक्त शिवारमुळे राज्यात मोठा फायदा झालाय,

– ज्या लातूरमध्ये पूर्वी भीषण पाणीटंचाई होती, ट्रेनने पाणी द्यावं लागलं होतं, आता जलयुक्त शिवारमुळे लातूरमध्ये फक्त दोन टॅँकर सुरु आहेत.

– दुष्काळात जलयुक्त शिवारचा मोठा फायदा झाला’

–  आगामी काळात ३५००० तलाव गाळमुक्त करुन, हा तलाव शेतीत टाकणार असंही मुख्यमंत्री म्हणाले.

– सरपंचाचं मानधन ५००० करणार आहे, सरपंचाचं मानधन त्यांच्या कामगिरीवर असणार आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 जालना –

पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रश्न विचारणाऱ्यावर भडकले. एका कार्यक्रमात शेतकऱ्याने पाणीप्रश्न विचारल्यानंतर लोणीकर संतापले. गावात प्यायला पाणी नाही, असं सांगताच लोणीकर भडकले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.