मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र, राज्य सरकारकडून केवळ जुलै महिन्यातील अतिवृष्टीसाठी मदत जाहीर करण्यात आलीय. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाबाबत अद्याप मदत जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलन सोमवारपासून सुरु केलंय. अशात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. (72-hour hunger strike by farmers in Latur, one farmer’s health deteriorated)