AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनगरांची पोरं मिटकरींच्या एका कानाखाली वाय तर दुसऱ्या कानाखाली…, हाकेंचा पुन्हा घणाघत

लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी अजित पवार आणि मिटकरी यांना जोरदार टोला लगावला.

धनगरांची पोरं मिटकरींच्या एका कानाखाली वाय तर दुसऱ्या कानाखाली..., हाकेंचा पुन्हा घणाघत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 6:11 PM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पावर आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला होता, त्याला आता लक्ष्मण हाके यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले हाके?

निवडणुकीत मी पराभूत झालो, पण अजित पावरांना त्यांच्या पोराला अजून निवडून आणता आलं नाही. अमोल मिटकरी मला वाय झेड म्हणाले, पण धनगराची पोरं या अमोल मिटकरींच्या एका खानाखाली वाय आणि दुसऱ्या गालात झेड काढल्याशिवाय राहणार नाहीत.  एखाद्याला वाय झेड म्हणणे म्हणजे काय? ठीक आहे ते  हे बोलले पण मी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर द्या. एका बाजूला सारथीची टोलेजंग इमारत उभी होते, पण आम्हाला बसायला ऑफिस भेटत नाही. ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळणार आहे की नाही? असा सवाल यावेळी हाके यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत, अमोल मिटकरी आणि अजित पवार यांना घटनेची प्रस्तावना माहिती नाही, मिटकरी स्वत:ला ओबीसी म्हणतात पण त्याबाबत ते कधी सभागृहात बोलले आहेत का? निवडणुकीत मी पराभूत झालो पण अजित पावरांना त्यांच्या पोराला अजून निवडून आणता आलं नाही. मग त्यावरून त्यांची लायकी काढणार का? असा हल्लाबोल यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली कशाला लागते? महाराष्ट्र मंत्रिमंडळात गोपीचंद पडळकर यांना अजून मंत्रिपद का दिलं नाही? तुम्ही छगन भुजबळ यांना का डावलले असा सवालही यावेळी हाके यांनी केला आहे.  दरम्यान  ‘मिटकरी आपण वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात. या सदसत्वाला शोभेल अशी भाषा तुम्ही वापरा, आम्ही जर बोलायला लागलो तर तुमचे सोडा, तुमच्या आकाचेही कपडे अंगावर राहणार नाहीत असा इशाराही हाके यांनी गुरुवारी मिटकरी यांना दिला होता.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.