AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून सरकारने त्यांना सरसकट मदत करावी अशी अपेक्षा आहे. मात्र सरकारने अद्याप पंचनामे देखील केले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून सरकार निवडणूक प्रचाराला गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सरकारला वेळ नाही अशी टिका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला
vijay vadettiwar
| Updated on: Dec 07, 2023 | 1:02 PM
Share

मुंबई | 7 डिसेंबर 2023 : अवकाळी पाऊस आणि नंतर चक्रीवादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली असून राज्य सरकारने हात वर केले आहेत. शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. चक्रीवादळाने 22 जिल्हे उद्धवस्त झाले आहे. सरसकट मदतीची अपेक्षा होती. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. परंतू पूर्णपणे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती या नव्या शब्दाचा खेळ केला असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा फटका बसला आहे. उपसमितीची बैठक झालेली नाही. केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. चक्रीवादळाचा फटका 22 जिल्ह्यांना बसला असून शेतकरी उद्धवस्त झाला असतानाही राज्य सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती असे तिचे नामकरण करीत मदतीपासून वंचित ठरविल्याची टिकाही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. त्यांचे कर्जमाफीची गरज असतानाही सरकारने अद्याप पंचनामे देखील पूर्ण केलेले नाहीत अशीही टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रातीस शेतकरी होरपळून निघाला आहे. सरसकट कर्जमाफीची गरज आहे. दक्षिणेकडून आलेल्या चक्रीवादळाने काहीही राहीलेले नाही. सरकारचा कुणी प्रतिनिधी नुकसान पहायला गेलेला नाही. मुख्यमंत्री इतर राज्यात प्रचारासाठी व्यस्त होते. त्यांना बांधावर जायला वेळ नव्हता असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महायुती सरकारच्या पाठीशी

केंद्र सरकारच्या दुष्काळी निकषानूसार 40 तालुके घोषीत झाले आहेत. जे दुष्काळी निकषात बसत नाही, त्यांना राज्यसरकारने मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जी दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत मिळणार तिच दुष्काळसदृश्य तालुक्यांना दिली जाईल कुठलाच भेदभाव केला जाणार नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीठ कुठलेही नुकसान असो सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु केली आहे. 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टर केला आहे, नियमांपेक्षा जास्त निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत