काँग्रेसकडून महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची पहिली यादी तयार

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची पहिली यादी तयार


Loksabha Election 2019 : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे 11 मार्च रोजी काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर होईल. 12 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी असेल. राज्यात आघाडी आणि युतीच्या चर्चा सुरु असताना, सर्वात आधी काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करुन बाजी मारणार असल्याचे दिसून येते आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवारांची यादी :

 1. मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा
 2. मुंबई उत्तर मध्य- प्रिया दत्त
 3. दक्षिण-मध्य- एकनाथ गायकवाड
 4. नंदुरबार- के सी पाडवी
 5. धुळे – रोहिदास पाटील
 6. रामटेक- मुकुल वासनिक
 7. हिंगोली- राजीव सातव
 8. नांदेड- अमिता चव्हाण
 9. सोलापूर- सुशीलकुमार शिंदे
 10. गडचिरोली- डॉ नामदेव उसेंडी
 11. वर्धा- चारुलता टोकस
 12. यवतमाळ- माणिकराव ठाकरे

पहिल्या यादीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विद्यमान खासदार राजीव सातव, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह दिग्गजांची नावं आहे. तसेच, नांदेडमधून विद्यमान खासदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

तसेच, उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा एकदा माजी खासदार प्रिया दत्त यांना लोकसभेचं तिकिट मिळणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI