राहुल गांधीनी सोनिया गांधीकडे राजीनामा दिला?

, राहुल गांधीनी सोनिया गांधीकडे राजीनामा दिला?

नवी दिल्ली : दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये कमालीचा हडकंप माजला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पराभवानंतर राजीनामा सोपवला. त्यानंतर आता खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सोपावल्याची माहिती मिळत होती. सोनिया गांधी यांनी हा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीकडे सुपुर्द करा असा आदेश राहुलना दिल्याचं सांगण्यात येत होतं.  मात्र काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्याचं वृत्त खोटं असल्याचं सुरजेवाला म्हणाले.

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पराभव मान्य असल्याचं सांगितलं. जनता मालक आहे, त्यांनी दिलेला कौल मान्य आहे, नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिनंदन, आमची विचारधारेची लढाई आहे असं राहुल गांधी म्हणाले.

माझ्या अध्यक्षपदाचा निर्णय वर्किंग कमिटी घेईल. मी भारतीय जनतेचा आदर करतो. यामुळे मी पराभव स्वीकार करतो आणि सर्व जवाबदारी स्वीकारतो, असं राहुल गांधी म्हणाले.

अमेठीत राहुल गांधींचा पराभव

अमेठीत भाजप नेत्या स्मृती ईरानी यांचा विजय झाला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, असं राहुल गांधी म्हणाले. आजच निवडणूक संपली आहे. आमची लढाई विचार धारेची आहे. ही लढाई पुढेही सुरुच असेल, असंही ते म्हणाले. माझ्यावर जे कोणी चुकीचे शब्द वापरले आहे, त्यांना मी नेहमी प्रेमाने उत्तर देईन, असं राहुल गांधींनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *