Loksabha 2019 : आज निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ : सर्व्हे

Loksabha 2019 : आज निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ : सर्व्हे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरने एका वाहिनीवर दाखवलेल्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजप अनेक जागा गमावणार आहे. तर महाआघाडी दक्षिण भारतात बाजी मारण्याची शक्यता आहे. प्रादेशिक पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण, मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र आलेले महाआघाडीतील पक्ष काँग्रेससाठी विजयाचा […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरने एका वाहिनीवर दाखवलेल्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजप अनेक जागा गमावणार आहे. तर महाआघाडी दक्षिण भारतात बाजी मारण्याची शक्यता आहे. प्रादेशिक पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण, मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र आलेले महाआघाडीतील पक्ष काँग्रेससाठी विजयाचा मार्ग सुकर करु शकतात.

सी व्होटरने उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दक्षिण भारतातील सर्व राज्य आणि ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये जनतेचा कल जाणून घेतलाय. शिवाय काँग्रेसकडून ज्या महाआघाडीचा प्रयत्न सुरु आहे, त्याबद्दलही लोकांचं मत जाणून घेतलंय. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा सर्व्हे करण्यात आला.

या सर्व्हेमध्ये देशातील सर्व मोठ्या राज्यांचा कौल जाणून घेण्यात आलाय. यानुसार एनडीएला 543 पैकी 247 जागा मिळताना दिसत आहेत. तर यूपीएला 171 जागा मिळत आहे. शिवाय इतरांच्या खात्यात 125 जागा जात आहेत. त्यामुळे एनडीए बहुमतापासून दूर राहत आहे. या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

गुजरातमधलं चित्र काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होम स्टेट गुजरातमध्ये एनडीएला मोठा फायदा होताना दिसतोय. पण 2014 च्या निवडणुकीत दोन जागा कमी होत आहेत. गेल्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. या सर्व्हेनुसार, एनडीएला 24 जागा मिळताना दिसत आहेत. तर यूपीएला दोन जागा मिळत आहेत.

एनडीए – 24

यूपीए – 02

एकूण – 26

मध्य भारतात काय होणार?

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्लाय. तर काँग्रेसने तीनही राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या तीन राज्यात लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. यापैकी एनडीएचा 47 जागांवर विजय होताना दिसतोय. तर यूपीएला 18 जागा मिळत आहेत.

एनडीए – 47

यूपीए – 18

एकूण – 65

मध्य प्रदेश

एनडीए – 23

यूपीए – 06

एकूण – 29

मध्य प्रदेशात भाजपला मात देत काँग्रेसने सत्ता मिळवली. पण याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने 29 पैकी 27 तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या.

राजस्थान

एनडीए – 19

यूपीए – 06

एकूण – 25

राजस्थानमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ झाला होता. भाजपने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या होत्या.

छत्तीसगड

एनडीए – 05

यूपीए – 06

एकूण – 11

छत्तीसगडमध्ये भाजपने 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवला होता. पण त्यावेळी राज्यातही भाजपचीच सत्ता होती. आता चित्र बदललेलं आहे.

महाराष्ट्रात काय होणार?

देशात सत्तेवर जाण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेची अत्यंत मोठी भूमिका असते. पण या निवडणुकीत एनडीएला मोठा फटका बसताना दिसतोय. राज्यातील एकूण 48 जागांपैकी एनडीएला फक्त 18 जागांवर विजय मिळताना दिसतोय, तर यूपीएला तब्बल 30 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचं विभाजन टाळण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. याचा परिणाम स्पष्ट जाणवतोय.

एनडीए – 18

यूपीए – 30

एकूण – 48

बिहारमध्ये एनडीएला फायदा

या सर्व्हेनुसार, बिहारमध्ये एनडीएला मोठा फायदा होताना दिसतोय. बिहारमध्ये जागावाटपाचा फॉर्मुलाही ठरला आहे. भाजप आणि जेडीयू 17-17 जागा लढणार आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. पण यावेळी दोन्ही पक्ष मिळून मोठं यश खेचून आणताना दिसत आहेत. बिहारमधील 40 जागांपैकी एनडीएला तब्बल 35 जागा मिळत आहेत. तर यूपीएला केवळ पाच जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं चित्र आहे.

एनडीए – 35

यूपीए – 05

एकूण – 40

बिहारमध्ये 2014 च्या निवडणुकीत एनडीएने 40 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. यावेळी चार जागांचा फायदा होताना दिसतोय. कारण, त्यावेळी नितीश कुमार एनडीएच्या सोबत नव्हते. त्यावेळी भाजप, एलजेपी आणि आरएलएसपी यांचा एनडीएमध्ये समावेश होता. भाजपने 30 जागांवर निवडणूक लढली आणि 22 जागांवर यश मिळालं होतं. पण आता एनडीएचा चेहरा बदललेला आहे. उपेंद्र कुशवाह यांचा पडलेला असून नितीश कुमार यांचा पक्ष सहभागी झालेला आहे.

उत्तर प्रदेशात काय होणार?

लोकसभेत सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशच्या आहेत. सपा आणि बसपा यांची युती न झाल्यास एकूण 80 जागांपैकी 72 जागा भाजपला मिळतील. तर सपाला चार आणि बसपाला दोन, तर काँग्रेसलाही दोन या सर्व्हेनुसार मिळत आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं होतं. पण सपा आणि बसपा यांनी एकत्र येण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.

सपा-बसपा एकत्र न आल्यास?

एनडीए – 72

सपा – 04

बसपा – 02

काँग्रेस – 02

एकूण – 80

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र आल्यास एनडीएला सपाटून मार खावा लागणार आहे. सर्व्हेनुसार, सपा-बसपाला एकूण 50 जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला 28 आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील.

सपा-बसपा एकत्र आल्यास?

एनडीए- 28

सपा-बसपा- 50

काँग्रेस- 02

एकूण – 80

पश्चिम बंगालमध्ये ममतांची जादू कायम

सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू कायम आहे. अनेक प्रयत्न करुनही भाजपच्या वाट्याला या ठिकाणी हवं तेवढं यश हाती आलेलं दिसत नाही. एकूण 42 जागांपैकी एनडीएच्या वाट्याला केवळ नऊ जागा येत आहेत. तर यूपीएला एक आणि ममतांच्या टीएमसीला 32 जागा मिळत असल्याचं चित्र आहे.

एनडीए- 09

यूपीए- 01

टीएमसी- 32

एकूण – 42

ओदिशात काय परिस्थिती?

ओदिशाची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. लोकसभा निवडणुकीतसोबतच या राज्याची निवडणूक होणार असल्याचं बोललं जातंय. एनडीएला या राज्यात फायदा होत असल्याचं दिसतंय. एकूण 21 पैकी एनडीएला 15, तर राज्यातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलला सहा जागा मिळताना दिसत आहेत.

एनडीए- 15

बीजेडी- 6

एकूण जागा – 21

इशान्य भारतात मोदी मॅजिक?

इशान्य भारतात मोदी मॅजिक चालणार असल्याचं दिसत आहे. सेव्हन सिस्टर्स म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये एनडीएसाठी खुशखबर आहे. या सात राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 27 जागा आहेत. एनडीएला यापैकी 18 तर यूपीएला चार आणि इतरांच्या खात्यात दोन जागा जाताना दिसत आहेत.

दक्षिण भारतात काय होणार?

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यातील जनतेने भाजपला नेहमीच नाकारलंय. या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व असतं. यावेळीही भाजपला या राज्यांमध्ये नाममात्र जागा मिळताना दिसत आहेत. या पाच राज्यातील एकूण 129 जागांपैकी तब्बल 80 जागा यूपीएच्या वाट्याला जाताना दिसत आहेत. एनडीए 15, तर इतरांच्या खात्यात 34 जागा जात आहेत.

दक्षिण भारतात डीएमके आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला सोबत जोडण्यास काँग्रेसला यश आलेलं आहे. तर कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस सोबत सत्तेत आहे. त्यामुळे या सर्व पक्षांना सोबत घेतल्याचा मोठा फायदा यूपीएला होत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें