अमोल कोल्हे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्याच नेत्याने दंड थोपटले?; शिरूरसह पुणे जिल्ह्यात चर्चाच चर्चा

Losabha Election 2023 : अमोल कोल्हेच्या विरोधात राष्ट्रवादीचा 'हा' नेता मैदानात उतरणार?; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अमोल कोल्हे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्याच नेत्याने दंड थोपटले?; शिरूरसह पुणे जिल्ह्यात चर्चाच चर्चा
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 10:45 AM

पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदार संघातून कोणता नेता निवडणूक लढवणार याबाबत चर्चा होतेय. अशातच राज्यात चर्चेत राहिलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आता काही वेगळी राजकीय समीकरण दिसणार का? असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्याच कारण ठरलंय भोसरीमध्ये लागलेले पोस्टर्स… शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्याच नेत्याचे काही पोस्टर्स पाहायला मिळत आहेत.

शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचाच नेता दंड थोपटणार असल्याचं बोललं जात आहे. कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर.

माजी आमदार विलास लांडेच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधत शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर भावी खासदार लिहिण्यात आलं आहे आणि तसंच संसदेचा फोटोही पाहायला मिळतोय.

मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील माजी आमदार विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मागच्या वेळीही विलास लांडेनी मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं.

अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आहेत. मध्यंतरी अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा होत होती. अशातच आता राष्ट्रवादीचाच नेता त्यांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहेत.

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं खासदारकीची उमेदवारी कुणाला देणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. पण सध्या तरी विलास लांडे यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघ आधीपासूनच चर्चेत आहे. अमोल कोल्हे नाराज असल्याचं बोललं जात असतानाच विलास लांडे यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.