AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NDA सोबत युती करून चूक, संधी मिळताच…महादेव जानकरांनी थेट जाहीर केलं; नेमकं काय म्हणाले?

महादेव जानकर यांनी आपल्या दिल्लीतील भाषणात अनेक महत्त्वाची विधानं केली. एनडीएसोबत होतो ही आमची चूक होती, असं जानकर यांनी म्हटलंय.

NDA सोबत युती करून चूक, संधी मिळताच...महादेव जानकरांनी थेट जाहीर केलं; नेमकं काय म्हणाले?
mhadev jankar
| Updated on: May 31, 2025 | 8:19 PM
Share

पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अहिल्याबाईंचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथेदेखील मोठा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. असाच एक कार्यक्रम दिल्लीतही घेण्यात आला. या कार्यक्रमत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे. एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती, असे जानकर यांनी म्हटलंय.

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नवी दिल्ललीच्या तालकटोरा स्टेडियमवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जानकर भाषण करत होते. याच भाषणादरम्यान त्यांनी आपली आगामी रणनीती सांगितली. मेल्यानंतर माझ्या मृतदेहावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. हे माझं उद्दीष्ट आहे, असेही जानकर म्हणाले.

यापूर्वी तुम्ही आम्हाला विचारात नव्हते

समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, खासदार राहुल गांधी, खासदार शरद पवार या कार्यक्रमाला आले नाहीत, म्हणून अनेकांच्या मनात शंका आहे. पण जो होता हैं अच्छे के लिये होता हैं, असं मत जानकर यांनी व्यक्त केलं. तसेच मागच्या वेळी आम्ही NDA सोबत होतो. सपकाळ साहेब (काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष) आपला पक्ष मोठा होता, म्हणून यापूर्वी तुम्ही आम्हाला विचारात नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

त्या दिवशी मी अमेरिकेत जयंती साजरी करेल

ज्या दिवशी केंद्रातील सरकार दिल्लीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करेल त्या दिवशी मी अमेरिकेत जयंती साजरी करेल. अहिल्याबाई होळकर यांची जयंती हे तर फक्त औचित्य आहे. खरं तर आम्हाला दिल्लीत सरकार आणायचं आहे. एक दिवस लाल किल्ल्यावरून आपलं भाषण झालं पाहिजे हा माझा संकल्प आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माझ्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले पाहिजेत

माझ्या मृत्यूनंतर माझ्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले पाहिजे, हे माझे उद्दीष्ट आहे. आम्ही एनडीएसोबत युती केली, ती आमची चूक होती. पण ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी आम्ही त्यांना सत्तेतून बाहेर काढू, असा इशाराच जानकरा यांनी दिला.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल