उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अयोध्येतील महंतांची धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहेत. शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अयोध्येतील महंतांची धमकी
| Updated on: Mar 01, 2020 | 10:30 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहेत. शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र या दौऱ्याला अयोध्येतील साधू-संतांनी विरोध केला आहे. हनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी महंत राजू दास यांनी दिली आहे.

“मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरुन भरकटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अयोध्येला येऊ देणार नाही,” असा इशारा हनुमानगढीचे पुजारी महंत राजू यांनी दिला (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहे.

यापूर्वीही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी महंत राजू दास यांनी टीका केली होती. अयोध्येला राजकारणापासून दूर ठेवा, असेही राजू दास म्हणाले होते. या दर्शन घ्या, आरती करा, पण अयोध्येत राजकारण करु नका असे अयोध्येतील संत-महंतांनी यापूर्वी दौऱ्यावेळी म्हटलं होतं.

महाविकासाआघाडी सरकारला 7 मार्चला 100 दिवस पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून अयोध्येमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

उद्धव ठाकरे दुपारी अयोध्येत श्री रामांचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती करतील, असे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सांगितले आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्तेही अयोध्येला जाणार (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहे.