LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Picture

ए टी पाटील बंडखोरी करणार

जळगाव : सलग दोनवेळा निवडणून आलेले भाजप खासदार ए टी पाटील आज बंडखोरी करणार, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या राजकीय षड्यंत्रामुळे पक्षाने तिकीट कापल्याचा पाटलांचा आरोप

26/03/2019,11:41AM
Picture

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार, महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान

26/03/2019,8:28AM
Picture

औरंगाबादमधून जलील रिंगणात

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, औरंगाबादमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार, चंद्रकांत खैरे, सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील असा सामना रंगणार

26/03/2019,7:38AM
Picture

नवनीत राणा आज अर्ज भरणार

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, सकाळी 10 वाजता रॅली काढून नवनीत अर्ज भरायला जाणार

26/03/2019,7:16AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *