Maharashtra Assembly | जल बिना मछली.. सुधीर मुनगंटीवारांची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, सत्ता हातून गेल्यामुळे अभिनंदनाच्या दिवशीही कंजुषी!

| Updated on: Jul 04, 2022 | 2:09 PM

अजित पवारांनी भाषण अभिनंदनपर भाषण करतानाही सत्ता गेल्याचं दुःख मांडलं. ही कंजुषी आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Maharashtra Assembly | जल बिना मछली.. सुधीर मुनगंटीवारांची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, सत्ता हातून गेल्यामुळे अभिनंदनाच्या दिवशीही कंजुषी!
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर अभिनंदनपर भाषणांना सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनीही अभिनंदनाचं भाषण करायला सुरुवात केली. मात्र यावेळी त्यांनी अभिनंदनापेक्षा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना (Rebel MLA) धारेवर धरण्याचीच वक्तव्य केली. यावर उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. जल बिना मछली.. ही कशी अवस्था असते, तशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. सत्ता हातून गेल्यामुळे त्यांनी अभिनंदनाच्या दिवशीही कंजुषी केल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

 भाषणातही सत्ता गमावल्याचं दुःख…

विधानसभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना सुधीन मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, ‘अजित दादांनी टीका केली. हा पक्ष समजताही येणार नाही. अजित दादांनीच आमच्यासोबत पहाटे शपथ घेतली. ते इतरांना काय सावधगिरीचा सल्ला देतायत? एकनाथ शिंदे आमदार आहेत. त्यामुळे पुढे काय होईल हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. इथं विश्वगौरव देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच सगळे माजी आमदार होणार आहेत. तुम्ही फक्त पाहिजे तर पेंशन वाढवण्याचा प्रस्ताव समोर ठेवा, असा सल्लाही सुधीन मुनगंटीवार यांनी दिला. तसेच मागील अडीच वर्ष जनता त्रस्त आणि सरकार सुस्त अशी स्थिती होती. आता तसं होणार नाही. अजित पवारांनी भाषण अभिनंदनपर भाषण करतानाही सत्ता गेल्याचं दुःख मांडलं. ही कंजुषी आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

अजित पवार काय म्हणाले?

बहुमत चाचणीनंतर भाषण करताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच आमदारांच्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे, असे खोटे आरोप करू नका,असा इशाराही दिला. ते म्हणाले, ‘ शिवसेना भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात वाढली आहे. शिवसेनेसोबत राहून भाजपने आपली ताकद महाराष्ट्रात वाढवली. आघाडी असली तरी त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार. पण शिंदे साहेब आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच बोललो नव्हतो, पण आज बोलतो, ही अनैसर्गिक युती, आमच्यावर अन्याय केला, असा पाढा वाचवण्याचं काम केलं. मी काम करताना असा भेदभाव कधीच करत नाही. एक कोटी रुपये आमदार निधी होता, तो दोन कोटी मीच केलं. आपण आल्याआल्या चार कोटी केला. त्यानंतर शिंदेसाहेब आपण एकत्र आल्यानंतर पाच कोटी केला. आपल्या सगळ्यांच्या मुळे आघाडीचं सरकार होतं. तुम्ही सतत म्हणता की आम्ही अन्याय केला. नगरविकास खात्याला कोट्यवधींचा निधी दिला. आपण खासगीत बोलत होतो. अजून नगरविकासला 1 हजार रुपये निधी देण्याबाबत बोलणं झालं. मी भेदभाव करणारा माणूस नाही…’