AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Speech| टेबलवर नाचणाऱ्यांपासून निधीवरून ओरडणाऱ्यांना… अजित पवारांचा इशारा, आजच्या भाषणातले 10 मुख्य मुद्दे!

आमदारांच्या विकास कामात निधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आडकाठी केल्याचा आरोप करणाऱ्यांनाही अजित पवारांनी चांगलंच सुनावलं. अजित पवार यांच्या भाषणातले मुख्य 10 मुद्दे महत्त्वाचे आहेत.

Ajit Pawar Speech| टेबलवर नाचणाऱ्यांपासून निधीवरून ओरडणाऱ्यांना... अजित पवारांचा इशारा, आजच्या भाषणातले 10 मुख्य मुद्दे!
Image Credit source: विधानसभा
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 04, 2022 | 1:26 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बहुमत चाचणीत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आज विधानसभेत आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं. विधानसभेत आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अभिनंदनपर भाषण केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही जोरदार भाषण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोमणे मारले. या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान फडणवीस आहेत, असे म्हणाले. कारण 2019 नंतर ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली.. अशी खोचक टीका अजित पवारांनी केली. तसेच आमदारांच्या विकास कामात निधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आडकाठी केल्याचा आरोप करणाऱ्यांनाही अजित पवारांनी चांगलंच सुनावलं. अजित पवार यांच्या भाषणातले मुख्य 10 मुद्दे कोणते, हे पाहुयात-

  1.  देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली.  कुणाला वाटलंही नव्हतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.
  2.  सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. पण देवेंद्रजी मी तुमचं भाषण बारकाईने ऐकलं, तुम्ही त्यांचं एवढं समर्थन करत होतात, मग मागच्या टर्म असतान फक्त रस्ते विकास महामंडळच त्यांच्याकडे का दिलं? नेता मोठा असला की खाती जास्त असतात, हे चंद्रकात पाटील यांना माहीत आहेत. जर शिंदे साहेब सर्वगुणसंपन्न होते, तर छोटंसं रस्ते विकास महामंडळ, ज्याचा जनतेशी संबंधच नव्हता, हायवे करायचे, टनल करायचे, असं असताना त्यांनी दुसरं कुठलं खातं का नाही दिलं? याचा महाराष्ट्रपण विचार करेल.
  3.  न्यायालयीन लढाई सुरु आहे. असं असताना ठराव इतक्या घाईत आणण्याची काही गरज नव्हती. पण अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम केलेलं आहे. 12 आमदारांच्या निवडीचा निर्णय त्यांनी निर्णय दिलेला नाही. आता ते अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. 12 आमदारांच्या निवडीचा प्रश्न लांबवला. पटोले साहेबांच्या राजीनाम्यानंतर प्रत्येक अधिवेशनात आम्ही शिंदेसाहेबांसोबत राज्यपालांना भेटायला गेलो. अध्यक्ष निवडीसाठी मागणी केली सातत्यानं. पण मागच्या चार दिवसात एवढ्या फास्ट घटना झाल्या, त्यानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका उपस्थित होतात.
  4.  गेल्या 8-10 दिवसांत राज्यात इतकं काही बरंच घडलं, की म्हटलं जातं की 40 आमदार उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवून गेला. त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं. आता जरा बाहेर शिवसैनिकांच्या मनात काय सुरु आहे, याची माहिती घ्या. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला, भुजबळ साहेबही 10 आमदार घेऊन बाहेर गेले, त्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही. राणेसाहेबांच्या नंतरही किती आमदार निवडून आले, याचंही आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे.
  5. संदीपानजी मिरच्या झोंबल्या पाहिजे, असं सांगत आहेत. तुम्ही मंत्री होतात आणि आपल्या कार्यकर्त्याला सांगताय की मिरच्या झोंबल्या पाहिजे, अरे काय…ssss सूरतवरु गुवाहाटी मग गोवा… माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात आतापर्यंतच्या हयातीत इतकं सगळं फिरायला मिळालं नसेल. मग आमचे शहाजीबापू.. काय झाडी… काय डोंगार… काय हॉटेल.. ओक्केयओक्केय… याच्यात फार गोंधळून जाण्याची आणि फार लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही..
  6. ही मोठी लोकं कधी एकत्र येतील, यांचा काही नेम नाही. शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो.. हॉटेलात काही जणांना नाच केला. नंतर टेबलावरच नाचायला लागले. सत्ता येते, जाते, आपण पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. त्यात प्रवक्ते म्हणून केसरकरांनी दिलगिरी व्यक्त केली. कारण त्यांच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार झालेलेत. अब्दुल सत्तारही शांत आहेत. मंत्रिमंडळाचं स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत शांत बसायची भूमिका घेतल्याचं दिसतंय. शिवसेनेच्या नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. येणाऱ्या निवडणुकीत काय ते स्पष्ट होईल.
  7. – 40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते, 106 आमदार असलेली मुख्यमंत्री होते, याच नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. आमच्या 105 मुळे आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत, हे मनुष्यस्वभाव बोलायला मागे पुढे पाहणार नाही, हे लक्षात घ्या
  8. शिवसेना भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात वाढली आहे. शिवसेनेसोबत राहून भाजपने आपली ताकद महाराष्ट्रात वाढवली. आघाडी असली तरी त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार. पण शिंदे साहेब आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच बोललो नव्हतो, पण आज बोलतो, ही अनैसर्गिक युती, आमच्यावर अन्याय केला, असा पाढा वाचवण्याचं काम केलं.
  9. मी काम करताना असा भेदभाव कधीच करत नाही. एक कोटी रुपये आमदार निधी होता, तो दोन कोटी मीच केलं. आपण आल्याआल्या चार कोटी केला. त्यानंतर शिंदेसाहेब आपण एकत्र आल्यानंतर पाच कोटी केला. आपल्या सगळ्यांच्या मुळे आघाडीचं सरकार होतं. तुम्ही सतत म्हणता की आम्ही अन्याय केला. नगरविकास खात्याला कोट्यवधींचा निधी दिला. आपण खासगीत बोलत होतो. अजून नगरविकासला 1 हजार रुपये निधी देण्याबाबत बोलणं झालं. मी भेदभाव करणारा माणूस नाही.
  10.  बजेटवर किंवा इतर बाबींवर मुख्यमंत्रीच हात फिरवतात. मग असं सांगण्यात आलं की राष्ट्रवादीमुळे अन्याय… राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थविभाग असताना, फक्त तुम्हीच नाही तर काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनीही याप्रकारचे आरोप झाले, तुम्हाला अनैसर्गिक आघाडी झाली, अमुक झालं, तमुक झालं, पण कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका..

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार