विधानसभा आढावा : संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशाने ऐरोलीत युतीत घमासान

अचानक संदीप नाईक (Sandeep Naik Airoli vidhansabha) यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या स्वप्नावर संक्रांत आली. दुसरीकडे संदीप नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.

विधानसभा आढावा : संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशाने ऐरोलीत युतीत घमासान
Follow us
| Updated on: Sep 09, 2019 | 5:46 PM

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik Airoli vidhansabha) यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे ऐरोली मतदारसंघातील युतीमध्येच राजकीय घमासान सुरु झालं आहे. या मतदारसंघात लोकसभेला शिवसेना खासदार राजन विचारे यांना जवळपास 44 हजारांचं मताधिक्य मिळालं. यामुळे शिवसेनेने ऐरोली विधानसभेवर (Sandeep Naik Airoli vidhansabha) आपला जोर वाढवला होता. पण अचानक संदीप नाईक (Sandeep Naik Airoli vidhansabha) यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या स्वप्नावर संक्रांत आली. दुसरीकडे संदीप नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करुन नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा क्षेत्र करण्यात आले. या नंतर गणेश नाईक यांनी आपले लहान चिरंजीव संदीप नाईक यांना 2009 मध्ये ऐरोली मतदारसंघात उतरवत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आणलं. यापूर्वी ते नवी मुंबई महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती होते. यानंतरच्या 2014 सालच्या निवडणुकीत संदीप नाईक यांनी दुसऱ्यांदा ऐरोली विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार झाले.

मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा केला जाण्याची शक्यता

ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपेक्षा जास्त आहे. याचदरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना ऐरोली मतदारसंघातून तब्बल 44 हजाराचं मताधिक्य मिळाल्याने ऐरोली विधानसभा क्षेत्रात संदीप नाईक कमकुवत झाले. येणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढणं सोपं नव्हतं म्हणून संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर ऐरोलीतून इच्छूक असलेल्या शिवसेना नेत्यांचा हिरमोड झाला. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पण युती न झाल्यास संदीप नाईक यांच्यासमोर शिवसेनेकडून तगडं आव्हान उभं राहू शकतं.

ऐरोली मतदारसंघातील 57 नगरसेवकांपैकी –

  • शिवसेना 26
  • राष्ट्रवादी काँग्रेस 22
  • काँग्रेस 3
  • भाजप 2
  • अपक्ष 4

संदीप नाईक यांचे पारडे जड

संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संदीप नाईक यांचं पारडं जड झालं आहे. तर राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने पक्षासाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्यास ऐरोली विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तसा शब्द घेतल्याने शिवसेनेला ही जागा सुटणं जवळपास दुरापास्त मानलं जातंय. संदीप नाईक यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि ज्येष्ठ नगरसेवक एम के मढवी हे संदीप नाईक यांचा प्रचार करणार का याकडे आता नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

भौगोलिक आणि जातीय गणितं

ऐरोली विधासभा मतदारसंघ हा मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी बहुल आहे. या क्षेत्रातील एकूण 57 नगरसेवकांपैकी जवळपास 20 नगरसेवक झोपडपट्टी बहुल भागातून निवडून आले आहेत. या मुळे शहरी भागाबरोबर झोपडपट्टी आणि स्थानिक आगरी कोळी लोकांच्या गावठाणातील प्रश्न हे मूळ समस्या आहेत. तुर्भे झोपडपट्टीत चार नगरसेवकांना निवडून आणणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी नाईकांबरोबर भाजपात जाण्यास नकार दिला असून शिवसेनेकडे त्यांची जवळीक वाढल्याने संदीप नाईकांना याचा फटका बसू शकतो. एपीएमसी मार्केटमुळे माथाडी वर्गाची मोठी मतदारसंख्या ऐरोली विधानसभेत आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी लोकसभेआधीच भाजपाशी जवळीक केल्याने याचा फायदा संदीप नाईकांना मिळणार आहे.

ऐरोली मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न

  • प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायमस्वरूपी करणं, त्यांना प्रॉपर्टी कार्डाचं वाटप करणं
  • ऐरोली येथील रखडलेले नाट्यग्रह
  • दिघामधील अनधिकृत इमारतींचा न सुटलेला प्रश्न
  • ऐरोली, कोपरखैरणे येथील पार्किंगचा प्रश्न गंभीर

2014 विधानसभा निकाल

  • संदीप नाईक- राष्ट्रवादी (विजयी ) – 76444
  • विजय चौगुले – शिवसेना – 67719
  • वैभव नाईक- भाजप – 46405

संभाव्य उमेदवार 2019

  • भाजप – संदीप नाईक, अनंत सुतार, चेतन पाटील
  • शिवसेना – विजय चौगुले, एम के मढवी, द्वारकानाथ भोईर
  • काँग्रेस – रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनवणे.
  • राष्ट्रवादी – सुरेश कुलकर्णी, शंकर मोरे, चंदू पाटील.
  • मनसे – निलेश बाणखिले
  • वंचित बहुजन आघाडी – खाजामिया पटेल
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.