भाजपच्या महामंत्रीपदी कुणाची वर्णी? शेलार, बावनकुळेंची नावं चर्चेत, मात्र पंकजा मुंडे, मेहतांवर फुली?

भाजपची कार्यकारिणी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. Maharashtra BJP executive committee

भाजपच्या महामंत्रीपदी कुणाची वर्णी? शेलार, बावनकुळेंची नावं चर्चेत, मात्र पंकजा मुंडे, मेहतांवर फुली?

मुंबई : भाजपची कार्यकारिणी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र भाजप कार्यकारिणीत अध्यक्षानंतर महत्त्वाचं समजलं जाणारं महामंत्री अर्थात सरचिटणीसपदी कोणाची वर्णी लागते त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत नाराज झालेल्या नेत्यांना किमान ही पदं तरी दिली जातात का याकडेही संबंधित नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. (Maharashtra BJP executive committee)

सरचिटणीस पदावर आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, सुजितसिंग ठाकूर, श्रीकांत भारतीय यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना यामध्ये विचार केला नसल्याची माहिती मिळत आहे. जर राज्य कार्यकारिणीतही या दिग्गजांचा विचार झाला नाही, तर भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांची केंद्रीय पक्ष संघटनेत वर्णी लागण्याचे संकेत आहेत. विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीटही नाकारलं होतं. शिवाय विधानपरिषद निवडणुकीतही त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. मात्र तावडे यांनी अन्य नेत्यांप्रमाणे त्याबाबत ना नाराजी व्यक्त केली ना पक्षविरोधी प्रतिक्रिया दिली. कदाचित त्याचंच बक्षीस तावडेंना मिळू शकतं.

महाविकास आघाडीतही कुरबूर वाढली

दरम्यान, एकीकडे भाजपमध्ये कार्यकारिणी जाहीर होत असताना, तिकडे सत्ताधारी महाविकास आघाडीतही कुरबूर वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना राष्ट्रवादीची आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट होत आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

(Maharashtra BJP executive committee)

संबंधित बातम्या 

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *