AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती तानाजी सावंत यांनी 2017 ला शिवसेनेत प्रवेश होता. जेव्हा पक्षाने त्यांना यवतमाळमधून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली.

Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Tanaji Sawant : शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 09, 2022 | 1:17 PM
Share

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharshtra) मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार अशी टीका विरोधक करीत होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेतल्यानंतर विस्तार केला आहे. आज सकाळी शिंदे गटातील आमदारांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्यानंतर आमदारांचा राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली. आज भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मंत्री तानाजीराव सावंताच्या गावात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. सोलापूरच्या वाकाव गावामध्ये मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण,तरुणाईने केला हालगीनाद करीत मनसोक्त डान्स करीत केला आनंदोत्सव साजरा करीत आहेत.

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा परिचय

  1. – तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहेत
  2. – 2015 साली राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन शिवसेनेत प्रवेश केला
  3. – 2016 साली शिवसेना उपनेते म्हणून नियुक्त करण्यात आले
  4. – 2016 साली सावंत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले
  5. – 2017 साली उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नियुक्त
  6. – 2018 – तानाजी सावंत हे 2014 सालच्या सेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले.
  7. – 2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद येथील परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले
  8. – मात्र महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज होते
  9. – पुणे आणि सोलापुरातल्या बार्शीत तानाजी सावंत यांच्या शिक्षणसंस्था
  10. – तर उस्मानाबादमध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्याचे अध्यक्ष

मिळालेल्या संधीचं सोनं केल होतं.

पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती तानाजी सावंत यांनी 2017 ला शिवसेनेत प्रवेश होता. जेव्हा पक्षाने त्यांना यवतमाळमधून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. मूळचे सोलापूरचे असलेले तानाजी सावंत यांनी निवडणुकीत विजय मिळवून पक्षातील आपले स्थान मजबूत होते. तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे उस्मानाबाद आणि सोलापूरचे प्रभारी उपनेते म्हणून जबाबदारी दिली होती.

उद्योजक म्हणून ओळख

‘करोडपती’ म्हणून ओळखले जाणारे तानाजी सावंत यांनी राज्य परिषदेच्या निवडणुकीत 115 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती – ते जयवंत शिंक्षण प्रसारक मंडळ (JSPM) आणि उस्मानाबादमधील साखर कारखाना सांभाळतात. 1998 मध्ये स्थापन झालेल्या जयवंत शिंक्षण प्रसारक मंडळाचे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कॅम्पस आहेत. शैक्षणिक संस्था आणि साखर कारखाना आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.