AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Expansion 2022 : आज शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘हे’ 10 महत्वाचे मुद्दे वाचायलाच हवेत…

आज शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार....

Maharashtra Cabinet Expansion 2022 :  आज शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'हे' 10 महत्वाचे मुद्दे वाचायलाच हवेत...
| Updated on: Aug 09, 2022 | 7:37 AM
Share

मुंबई : बंडखोरीच्या 10 दिवसांच्या हायहोल्टेज ड्राम्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath  Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला गोपनियतेची शपथ घेतली अन् राज्यात नवं सरकार आलं. या काळात महाराष्ट्राने वेगळं राजकारण पाहिलं. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. मग शिंदेंनी आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला. या सगळ्या घडामोडींदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार रखडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच बैठका व्हायच्या. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) मात्र 39 दिवस रखडला होता. पण आता आज या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. आज नवे मंत्री शपथ घेतील. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हे शपथविधी होतील. पण या सगळ्या घडामोडीत महत्वाचे 10 मुद्दे वाचायलाच हवेत…

  1. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मानाचं पान मिळवण्यासाठी अनेकांनी लॉबिंग केलंय. पण त्याला किती यश येतं आणि कुणाला शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल. आज 20-22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपला 24 तर शिंदेगटाला 18 मंत्रिपदं असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे.
  2. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे या भाजप नेत्यांना शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ आणि संदिपान भुमरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश असण्याची शक्यता आहे.
  3. आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय. यात माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही मोठं खातं मिळण्याची शक्यता होती. पण याआधीच म्हणजे कालच त्यांच्यासमोर संकट उभं ठाकलं. TET घोटाळ्यात त्यांच्या मुलांची नावं समोर आलं. अन् त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का हे पाहावं लागेल.
  4. धक्का तंत्राचा मंत्र! भाजपचं राजकारण ‘पार्टी फर्स्ट’ या तत्वावर चालतं. त्यामुळे कोण्या बड्या नेत्याऐवजी ते प्रकाशझोतात नसलेल्या नेत्यांना ते संधी देतात. तसंच काहीसं मंत्रिमंडळ विस्तारादरम्यानही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपतील प्रस्थापित नेत्यांऐवजी सामान्य भाजप कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या गटातील नेत्यांची मनधरणी करताना एकनाथ शिंदेंचा मात्र कस लागणार आहे.
  5. आज मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार होतोय. यात विधान परिषद सदस्यांचा समावेश असणार नाही. विधान परिषद सदस्यांना विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून संधी दिली जाणार नसल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाकडे एकही विधान परिषदेचा अधिकृत आमदार नाही!
  6. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांना निमंत्रण आहे तर विरोधी पक्षनेते अजित पवार, भारती पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
  7. चंद्रकांत पाटील यांचा जर मंत्रिमंडळात समावेश झाला तर भाजप प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार, याची सध्या चर्चा होतेय. चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांचं नाव आघाडीवर आहे. तर ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुठे यांची नावं चर्चेत आहेत.
  8. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेकदा वावड्या उठल्या. लवकरच विस्तार होणार अश्या चर्चा झाल्या. दरम्यान मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठत भाजपश्रेष्टींशी चर्चांवर चर्चा केल्या. विस्ताराच्या पुर्वसंध्येलाही शिंदेंच्या नंदनवर बंगल्यावर चर्चासत्र झालं. त्यात खातेवाटपावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
  9. सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती शिंदे गटाकडे राहणार असल्याची चर्चा आहे. तर गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, अशी चर्चा आहे. फडणवीसांचा गृहविभागात दबदबा आहे. अश्यात गृहखातं त्यांच्याकडेच राहणार असल्याचं जवळजवळ फिक्स आहे.
  10. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी हा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. तर विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती आज होणाऱ्या बैठकीत विधीमंडळ अधिवेशाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होणार आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.