सर्वात मोठी बातमी | मंत्रिमंडळ विस्तारावर आजच शिक्कामोर्तब? शिंदे-भाजपातून कोण कोण इच्छुक?

राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेल्या इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत.

सर्वात मोठी बातमी | मंत्रिमंडळ विस्तारावर आजच शिक्कामोर्तब? शिंदे-भाजपातून कोण कोण इच्छुक?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 2:34 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या दृष्टीने या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी हाती येऊ शकते.

कधी होणार बैठक?

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंबंधीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत काढण्यासंबंधी रणनीती आज ठरवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी साखर उद्योगातील महत्त्वाचे भाजप नेते दिल्लीत उपस्थित आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक आहे. अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोण कोण इच्छुक?

राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेल्या इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत.

शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा समावेश आहे. मंत्रिपदाचं आश्वासन मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडूही खातेवाटपाच्या प्रतीक्षेत आहेत.

तर भाजपच्या गोटातून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर शिवसेना पक्षाविषयी महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्ट तसेच निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. या सुनावणीतील घडामोडींनुसार, मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही म्हटले जात होते. मात्र आज दिल्लीतील बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.