AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Rathod : संजय राठोड यांनी मंत्री पदाची शपथ घेताचं चित्रा वाघ यांची टीका; जाणून घ्या राजकारणातली सुरुवात

संजय राठोड बंजारा समाजातून येतात. त्यांनी त्यांची शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले होते.

Sanjay Rathod : संजय राठोड यांनी मंत्री पदाची शपथ घेताचं चित्रा वाघ यांची टीका; जाणून घ्या राजकारणातली सुरुवात
संजय राठोड यांनी मंत्री पदाची शपथ घेताचं चित्रा वाघ यांची टीका; जाणून घ्या राजकारणातली सुरुवात Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 09, 2022 | 2:46 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा शिंदे मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, “चव्हाण यांच्या निधनाला कारणीभूत असलेले माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड यांच्या विरोधात मी माझा लढा सुरूच ठेवत आहे. तसेच न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असा टोला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राजभवनात 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापैकी 9 मंत्री भाजपचे तर 9 मंत्री एकनाथ शिंदे गटाचे आहेत. महाराष्ट्रात झालेल्या उलथापालथीनंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, सरकार स्थापनेच्या 40 दिवसांनंतरचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे.

संजय राठोड यांचा थोडक्यात परिचय

संजय राठोड बंजारा समाजातून येतात. त्यांनी त्यांची शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले होते. विशेष म्हणजे संजय राठोड यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माणिक ठाकरे यांचा मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. 2009 मध्ये त्यांनी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा देखील त्यांनी पराभव केला. त्यावेळी त्यांनी मोठ्या फरकाने त्यानी संजय देशमुख याचा पराभव केला. त्यावेळी त्यांनी 60 अधिक मते घेऊन बाजी मारली होती. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षात अधिक महत्त्व होतं.

कोणत आहेत संजय राठोड?

  1. विदर्भातील बडे नेते म्हणून संजय राठोड यांची ओळख आहे.
  2. 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले
  3. 2009 आणि 2014 दोन्ही वेळा विधानसभेत आमदार होते
  4. 2014 राज्यमंत्रिपदाची धुरा मिळाली
  5. 2019 मध्ये महाविकास आघाडीकडून मंत्रीपद मिळालं होतं
  6. 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.