Sanjay Raut : हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल, राऊतांचा दावा

| Updated on: Jul 24, 2022 | 10:50 AM

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काल आदित्य ठाकरे वैजापूर, पैठणला होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Sanjay Raut : हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल, राऊतांचा दावा
हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल, राऊतांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी राज्याती शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे चोऱ्यामाऱ्या करून आलं आहे. त्यांचा पाया मजबूत नाही. हे सरकार लवकर पडेल. अंतर्गत कलहानेच पडेल. आम्ही तारखा देत बसणार नाही. त्यांना कितीही पिपाण्या वाजवू द्या. अगदी सनई चौघडेही वाजवू द्या. पण हे सरकार जाणार म्हणजे जाणार, असं सांगतानाच शिवसैनिकांच्या (shivsena) अश्रूच्या महापुरात हे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, असा दावाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावरही जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर कितीही कारवाई केली तरी त्यांचे सर्व कारनामे मला माहीत आहेत, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाथसागरच जणू रस्त्यावर उतरला

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काल आदित्य ठाकरे वैजापूर, पैठणला होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. माणसांच्या तरुणांच्या रुपात नाथसागरच जणू रस्त्यावर उतरल्याचं चित्रं होतं. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. पण हे चित्रं आगामी काळातही दिसेल, असं राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आम्ही तारखा देणार नाही, पण

ज्यांनी चोऱ्यामाऱ्या करून सरकार स्थापन केलं, भाजप असेल अन्य कुणी असेल, त्यांच्या छातीत धडकी भरवणारे आहे हे चित्रं होतं. अनेक जुन्या शिवसैनिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या अश्रूच्या महापुरातच डबल स्टँडर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. ही भावना लोकांच्या मनात आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही हे सरकार जाणार असल्याचं वारंवार सांगत आहेत. पण आम्ही भाजपसारखं बोलणार नाही. आम्ही तारखा देणार नाही. 11 दिवसात सरकार पडेल, 15 दिवसात सरकार पडेल, अशा तारखा आम्ही लाऊडस्पीकरवरून त्यांच्या सारख्या देणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार टिकत नाही. हे सरकार राहत नाही. हे सरकार बहुमत गमावेल. हे सरकार अंतर कलहाने पडेल. हे सरकार मजबूत पायावर कधीच उभं नव्हतं आणि नाही आणि राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

शिवसेनेचा लाऊडस्पीकर घुमतच राहील

आता कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. कुणाला काय पिपाण्या वाजवायच्या त्या वाजवू द्या. सनई चौघडे वाजवायचे ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा बुलंद आवाज आहे. तसाच तो घुमत राहील. भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. त्यांचे भोंगे भाडोत्री आहेत. शिवसेनचा लाऊडस्पीकर 56 वर्ष सुरू आहे. हा लाऊडस्पीकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी 56 वर्ष महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे उभा आहे. तो तसाच राहील, असंही ते म्हणाले.