Sanjay Raut : पोटातील मळमळ ओठावर आली, कोल्हापूरचं पाणी दाखवलं, चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : कुणाला काय बोलायचं. कुणाला काय पिपाण्या वाजवायच्या, सनई चौघडे वाजवायचे ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर जो आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे. तसाच तो घुमत राहील. भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. त्यांचे भोंगे भाडोत्री आहेत.

Sanjay Raut : पोटातील मळमळ ओठावर आली, कोल्हापूरचं पाणी दाखवलं, चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन; संजय राऊतांचा हल्लाबोल
कोल्हापूरचं पाणी दाखवलं, चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन; संजय राऊतांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:30 AM

मुंबई: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना मुख्यमंत्री केल्याचं विधानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी चिमटा काढला. भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही. तिथे मनमोकळेपणाने बोलता येत नाही. देशातही तिच परिस्थिती करून ठेवली आहे. पण भाजपमध्ये अजिबात बोलता येत नाही. पण तरीही चंद्रकात पाटील यांचं मी अभिनंदन करतो. ते भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल कोल्हापुरचं पाणी दाखवलं. त्यांचा कोल्हापूरशी फार संबंध नसला पुण्यात आले असले तरी थोडं त्यांनी कोल्हापूरचं पाणी दाखवलं. जे पोटात मळमळत होतं. ते ओठावर आलं. नंतर त्यांना खुलासा करावा लागला. ही भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, अशी सारवासारव केली गेली. ही भाजपची भावना आहे तर त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यामध्ये हम दोनो, एक दुजे के लिए याच स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. कितीवेळा दिल्लीला जाताय? किती वेळा? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठिक आहे. भाजपचं राज्य आहे. ते म्हणत असतील शिंदेगट शिवसेना आहे. पण नाही. शिवसेना काल पैठणला दिसली, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पाठित खंजीर खुपसू नका

माणूस किती बेमालूमपणे खोटं बोलू शकतो. असत्याला सत्य करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्यच असतं. लाखो करोडो मराठी माणूस अस्वस्थ आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला. सरकार स्थापन केलं. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

तुमचे भोंगे भाडोत्री

कुणाला काय बोलायचं. कुणाला काय पिपाण्या वाजवायच्या, सनई चौघडे वाजवायचे ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर जो आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे. तसाच तो घुमत राहील. भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. त्यांचे भोंगे भाडोत्री आहेत. शिवसेनचा लाऊडस्पीकर 56 वर्षापासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी 56 वर्ष महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे उभा आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.