लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान
7. डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ वर लॉग इन करावं लागेल. यानंतर, डाउनलोड ई-ईपीआयसीच्या पर्यायावर क्लिक करा. लक्षात असुद्या 25 जानेवारी रोजी सकाळी 11.14 वाजेपासून डाउनलोड सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबई : सर्वत्र सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी 29 एप्रिलला राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष, तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 332 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. मतदानावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांवर, तर उत्तर महाराष्ट्रातील 7 जागांवर उद्या मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्वत्र कडकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.

या लोकसभा मतदारसंघामध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33  हजार 314 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रात सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू), तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आली आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यात 31 मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं आहे. त्यानुसार राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे. तसेच ‘सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वीच्या टप्प्यातील मतदानासाठी पुरवण्यात आल्या आहेत.

दरम्यान उद्या नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :

 • नंदुरबार – 18 लाख 70 हजार 117 ( 9 लाख 43 हजार 745 पुरुष, 9 लाख 26 हजार 350 महिला) 2115 मतदान केंद्र
 • धुळे- 19 लाख  4 हजार  859 (9 लाख 93 हजार 903 पुरुष, 9 लाख 10 हजार 935 महिला), 1940 मतदान केंद्र
 • दिंडोरी- 17 लाख 28 हजार 651 ( 9 लाख 1 हजार 82 पुरुष, 8 लाख 27 हजार 555 महिला), 1884 मतदान केंद्र
 • नाशिक -18 लाख 82 हजार 46 ( 9 लाख 88 हजार 892 पुरुष, 8 लाख 93 हजार 139 महिला), 1907 मतदान केंद्र
 • पालघर – 18 लाख 85 हजार 297 ( 9 लाख 89 हजार पुरुष,  8 लाख 96 हजार 178 महिला), 2170 मतदान केंद्र
 • भिवंडी-  18 लाख 89 हजार 788 (10 लाख 37 हजार 752 पुरुष,  8 लाख 51 हजार 921 महिला), 2200 मतदान केंद्र
 • कल्याण- 19 लाख 65 हजार 131 (10 लाख 61 हजार 386 पुरुष , 9 लाख 3 हजार 473 महिला), 2063 मतदान केंद्र
 • ठाणे- 23 लाख 70 हजार 276 (12 लाख 93 हजार 379-पुरुष,  10 लाख 76 हजार 834 महिला), 2452 मतदान केंद्र
 • मावळ- 22 लाख 97 हजार 405 ( 12 लाख 2 हजार 894 पुरुष,  10 लाख 94 हजार 471 महिला), 2504 मतदान केंद्र
 • शिरुर- 21 लाख 73 हजार 527  (11 लाख 44 हजार 827 पुरुष,  10 लाख 28 हजार 656 महिला) 2296 मतदान केंद्र
 • शिर्डी- 15 लाख 84 हजार  (8 लाख 21 हजार 401 पुरुष, 7 लाख 62 हजार 732 महिला), 1710 मतदान केंद्र
 • उत्तर मुंबई – 16 लाख 47 हजार 208 (8 लाख 90 हजार पुरुष, 7 लाख 56 हजार 847 महिला, 1715 मतदान केंद्र
 • उत्तर-पश्चिम मुंबई – 17 लाख 32 हजार (पुरुष- 9 लाख 50 हजार 302, महिला- 7 लाख 81 हजार 765), 1766 मतदान केंद्र
 • उत्तर-पूर्व मुंबई – 15 लाख 88 हजार 331 (पुरुष- 8 लाख 64 हजार 646, महिला- 7 लाख 23 हजार 542), 1721 मतदान केंद्र
 • उत्तर-मध्य मुंबई – 16 लाख 79 हजार 732 (पुरुष-9 लाख 16 हजार 627 महिला- 7 लाख 63 हजार), 1721 मतदान केंद्र
 • दक्षिण-मध्य मुंबई 14 लाख 40 हजार 142  (पुरुष- 7 लाख 77 हजार 714, महिला- 6 लाख 62 हजार 337), 1572  मतदान केंद्र
 • दक्षिण मुंबई- 15 लाख 53 हजार 925  (पुरुष- 8 लाख 54 हजार 121, महिला- 6 लाख 99 हजार 781), 1578  मतदान केंद्र

मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुले इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाला भर पगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत देणे बंधनकारक असणार आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI