AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

राष्ट्रवादीकडून मुश्रीफांना बऱ्यापैकी पाठिंबा पाहायला मिळाला. आता काँग्रेस पक्षही मुश्रीफांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. काँग्रेस नेते तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुश्रीफांना फुल सपोर्ट दर्शविला आहे.  

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, 'बदनामीचा कट हाणून पाडू'
हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Sep 24, 2021 | 3:37 PM
Share

कोल्हापूर :  भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांचं टेन्शन वाढवलं  आहे. मुश्रीफांनी सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावत अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीकडून मुश्रीफांना बऱ्यापैकी पाठिंबा पाहायला मिळाला. आता काँग्रेस पक्षही मुश्रीफांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. काँग्रेस नेते तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुश्रीफांना फुल सपोर्ट दर्शविला आहे.

सतेज पाटलांचा मुश्रीफांना फुल सपोर्ट

सतेज पाटील यांनी किरीट सोमय्यांना इशारा देताना मुश्रीफांना पाठिंबा दिलाय. मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली आहे. तसंच इथल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, असं आवाहन देखील सतेज पाटलांनी सोमय्यांना केलंय.

सोमय्यांनी मुश्रीफ साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु मुश्रीफ साहेबांनी यावर खुलासाही केलाय. त्यामुळे खुलासा केल्यानंतर त्यांनी पुन्हा दौरा काढण्याची काही गरज नाही, मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी रोखठोक भूमिका सतेज पाटील यांनी घेतलीय.

सोमय्यांचा कोल्हापूर दौरा जाहीर

किरीट सोमय्या यांनी 28 आणि 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी मी कोल्हापूरला जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तसं पत्र कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

20 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना कराडमध्येच रोखून धरलं. सोमय्यांनी तिथेच पत्रकार परिषद घेत मुश्रींफांविरोधात 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. तासाभराच्या आतच मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले.

सोमय्या-मुश्रीफांमध्ये आरोप-प्रत्यारोप

20 सप्टेंबरला किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्येच उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना 20 तारखेच्या पहाटे कराडमध्ये उतरवलं.

दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर सोमय्यांविरुद्ध दुसरा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. किरीट सोमय्यांनी दुसरा 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर आता आपण 50 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

हे ही वाचा :

गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा, हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचा दुसरा हल्ला, उद्या तिसरा घोटाळा बाहेर काढणार

किरीट सोमय्यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, किरीट सोमय्यांनी माफी मागावी : हसन मुश्रीफ

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?