AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेची रणधुमाळी! शिवेसना, भाजप, काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीकडून कोण? जाणून घ्या परिषदेचं गणित

भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून दोन आणि काँग्रेसकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीकडूनही दोन उमेदवारांची नावं जाहीर होतील. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.

Maharashtra MLC Election : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेची रणधुमाळी! शिवेसना, भाजप, काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीकडून कोण? जाणून घ्या परिषदेचं गणित
महाराष्ट्र विधान भवनImage Credit source: TV9
| Updated on: Jun 08, 2022 | 4:31 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीचे (MLC Election) वारेही आता वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून (Shivsena) दोन आणि काँग्रेसकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीकडूनही दोन उमेदवारांची नावं जाहीर होतील. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.

कुणाच्या किती जागा निवडून येतील?

विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. तर एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपला आहे. यासह एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सध्याच्या राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी होतील. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसला अजून एका जागेसाठी म्हणजेच 10 व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 10 व्या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.

10 व्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत

आता प्रश्न उरतो तो 10 व्या जागेचा. कारण सर्व राजकीय पक्षांचं संख्याबळ पाहिलं तर 9 जागांचा निकाल सहजपणे लागू शकतो. तर 10 व्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. विधान परिषदेत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 आमदारांची मतं मिळणं गरज आहे. भाजप आणि अपक्ष मिळून भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यानुसार भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील. महाविकालस आघाडीकडे एकूण 169 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहजरित्या निवडून येऊ शकतो. पण काँग्रेसनं 10 व्या जागेसाठी उमेदवार दिलाय. त्यामुळे या 10 व्या जागेवर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळू शकतं.

भाजपकडून पाच उमेदवार जाहीर

भाजपकडून विधान परिषदेसाठी विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील दरेकर, लाड, भारतीय आणि शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. तर उमा खापरे यांचा अर्ज उद्या सकाळी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरला

शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेले आणि आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात मोठा वाटा असलेले सचिन अहिर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. तर आदिवासी नेते आमशा पाडवी यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

काँग्रेसकडून दोन नावं जाहीर

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दोन नावांची घोषणा करण्यात आलीय. त्यात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचीही उमेदवार काँग्रेसकडून घोषित केली आहे.

भाजपकडून कुणाचा कार्यकाळ पूर्ण?

प्रवीण दरेकर सुजितसिंह ठाकूर प्रसाद लाड सदाभाऊ खोत विनायक मेटे

राष्ट्रवादीच्या कुणाचा कार्यकाळ पूर्ण?

रामराजे निंबाळकर संजय दौंड

शिवेसनेच्या कुणाचा कार्यकाळ पूर्ण?

सुभाष देसाई दिवाकर रावते

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.