Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द, वडिलांची प्रकृती खालावली

Maharashtra News LIVE : केंद्र सरकारने चार दिवसीय संसद अधिवेशन बोलावले आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द, वडिलांची प्रकृती खालावली
Big Breaking
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 9:42 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 28 Nov 2026 09:50 AM (IST)

    अकोल्याच्या रेल्वे स्टेशन चौकात तरुणाला भररस्त्यात चोप

    अकोल्याच्या रेल्वे स्टेशन चौकात एका तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेची छेड काढल्याचा आणि दादागिरी केल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी या तरुणाला चोप दिला. भाजपचे नगरसेवक हर्षद भांबेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाला काठीने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे..

  • 28 Nov 2026 09:42 AM (IST)

    पवारांचा पक्ष फक्त सत्तेसाठी- विजय वडेट्टीवार

    सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांना अभिवादन करतो. त्यांच्या पुण्यतिथादिवशी बहुजनांना न्याय मिळावा, ओबीसींना न्याय मिळावा, त्यांची जनगणना होताना, त्यांचा स्वातंत्र्य कॉलम असावा, यामागणी रॅली होत आहे. पवारांचा पक्ष फक्त सत्तेसाठी आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले.


  • 28 Nov 2026 09:40 AM (IST)

    बुधवार पेठे परिसरातील मिठाई व्‍यावसायिकांवर एफडीएची कारवाई

    बुधवार पेठ परिसरातील मिठाई व्यवसायिकावर एफडीएने काल जोरदार कारवाई केली आहे. अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आठ व्‍यावसायिकांची तपासणी करून ५१२.१ किलो मिठाई जप्त केली. सुमारे २ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा हा साठा नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.

  • 28 Nov 2026 09:32 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द

    मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या वडिलांवर छत्रपती संभाजीनगर येथील MGM रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज जरांगे पाटील बीड सह पुणे दौऱ्यावर होते, विविध ठिकाणी कार्यक्रम होणार होते. मात्र आता सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. रात्रीपासून त्यांच्या वडिलांची प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

  • 28 Nov 2026 09:30 AM (IST)

    लष्कराने उभारलेला प्रभादेवी-परळ पादचारी पूल तोडण्यात येणार

    एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर अवघ्या ११७ दिवसांत लष्कराने उभारलेला प्रभादेवी-परळ पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. खार ते मुंबई सेंट्रलदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पुलाची जागा आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेकडून पुलाच्या परिसराची पाहणी सुरू आहे. पर्यायी पादचारी पूल उभारण्यासाठी जागेचीही तपासणी. एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्यानंतर हा पूल तातडीने उभारण्यात आला होता.


  • 28 Nov 2026 09:29 AM (IST)

    दौंड रेल्वे स्थानकात हॉटेलच्या छताला अचानक आग

    दौंड रेल्वे जंक्शन येथील फलाट क्रमांक तीनच्या कॅन्टीनच्या छताला रात्री साडेदहा-आकराच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. सदरची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने वेळीच सतर्क होऊन पाण्याने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आग लगेच आटोक्यात येऊन मोठी दुर्घटना टळली. यावेळी पुढील अनर्थ होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने काही काळ रेल्वे स्टेशन वरील वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

  • 28 Nov 2026 09:26 AM (IST)

    उरुळी कांचनमध्ये डंपरचा भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू

    पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी चौकात भरधाव डंपरने दुचाकीला चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • 28 Nov 2026 09:26 AM (IST)

    शिरूरमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने जीवन संपवले

    व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही पुन्हा ३५ लाख रुपयांची मागणी, वारंवार वसुलीचा तगादा आणि मानसिक त्रास… या जाचाला कंटाळून शिरूर येथील व्यावसायिक संजय बलदोटा यांनी आपले जीवन संपविले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शिरूर परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 28 Nov 2026 09:23 AM (IST)

    डिलिमिटेशन विधेयक काळाची गरज- राधाकृष्ण विखे पाटील

    विनाकारण विरोधाची भूमिका घेण्याची गरज नाही. काँग्रेसच्या विरोधाच्या भूमिकेला जास्त समर्थन मिळणार नाही.  डिलिमिटेशन विधेयक
    काळाची गरज होती असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

लोकसभेत महिला आरक्षण बिल लागू करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा नवीन सुधारणा विधेयक घेऊन येत आहे. यामुळे राजकीय समीकरण मात्र पार बदलून गेले आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत राज्यघटना (132 वी सुधारणा) विधेयक, 2026 सादर केले जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी चार दिवसीय संसद अधिवेशन बोलावले आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची संख्या 50 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. दक्षिण भारतातील राज्यात त्या तुलनेत खासदार आणि आमदारांच्या जागा वाढणार नाही. योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नाही अशी जी शंका होती, ती दूर करण्याचा प्रयत्न या नवीन विधेयकाच्या माध्यमातून सरकार करणार आहे.

मोदी सरकारने हे बिल संसदेत मंजूर करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला आमचा पाठिंबा असल्याचे म्हणत सर्वांना धक्काच दिला. हा इंडिया आघाडीला धक्का होता. मात्र, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या दाव्यानंतर सावध भूमिका घेतली.

महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने म्हटलं की, शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us