शपथविधीनंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने घडतील : सुजय विखे

मुंबई : भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील मोठे संकेत दिले आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील, असे संकेत त्यांनी दिले. वडील राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखेंचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय. जूनच्या पहिल्या आठवड्यात विखे पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. …

शपथविधीनंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने घडतील : सुजय विखे

मुंबई : भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील मोठे संकेत दिले आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील, असे संकेत त्यांनी दिले. वडील राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखेंचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय. जूनच्या पहिल्या आठवड्यात विखे पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत.

सुजय विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुकीतील सहकार्याबद्दल आभार मानले. शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखेंनी दिली. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरही वक्तव्य केलं.

राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. जसा माझा सन्मान केला, तसा मुख्यमंत्रीसाहेब माझ्या वडिलांचा सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखेंनी दिली.

विखे पाटलांनीही भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. पण कोणत्याही आमदारांशी अजून चर्चा केली नसल्याचं ते म्हणाले. एका आठवड्यात भाजपप्रवेशाचा निर्णय होईल. मंत्रीपदाबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यावर, केंद्रीय नेतृत्त्वावर काही बोलणार नाही, पण राज्यातील नेतृत्त्वाने आत्मचिंतन करावं, असा सल्लाही विखे पाटलांनी दिला. पंतप्रधान मोदींना जनाधार मिळत असेल, तर तो का मिळाला याचा विचार काँग्रेसने करावा, असं ते म्हणाले. लोकांनी काँग्रेसला नाकारलंय हे त्यांनी लक्षात घ्यावं, असंही ते म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *