खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळ बैठकीत, अशोक चव्हाणांना पत्ताच नाही, मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी

| Updated on: Jul 24, 2020 | 11:10 AM

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. Ashok Chavan upset again

खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळ बैठकीत, अशोक चव्हाणांना पत्ताच नाही, मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीतील नाराजीची घोडदौड काही केल्या थांबताना दिसत नाही. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहेत. (Ashok Chavan upset again)

राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. (Ashok Chavan upset again)

अधिकाऱ्यांनी त्या त्या खात्यातील मंत्र्यांना गृहित धरुन, परस्पर प्रस्ताव तयार करणे चुकीचे आहे. असे प्रस्ताव सर्वात आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र तसं न झाल्याने अशोक चव्हाण नाराज होणं साहजिक आहे.

यापूर्वीही अशोक चव्हाणांची नाराजी

अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. “ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही”, अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. (Ashok Chavan nervous on Thackeray government). “तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार”, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

मुख्यमंत्र्यांची भेट

काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 18 जून रोजी भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बैठकीला ‘मातोश्री’वर आले होते. आमची काही नाराजी नाही, सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.

संबंधित बातम्या 

‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त 

Nitin Raut congress upset | आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त 

Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात 

निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार   

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस 

(Ashok Chavan upset again)