Vidhan Parishad Election : पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय, मुख्य प्रतोद अनिल पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Maharashtra MLC Election 2022 : शिवसेनेला राज्यसभेच्या वेळी जी मतं ठरली होती, ती देण्यात आली. जी मदत लागली ती राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे अपक्षांचा जो कोटा आहे. तो महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

Vidhan Parishad Election : पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय, मुख्य प्रतोद अनिल पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
अनिल पाटीलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 12:18 PM

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) आपला तिसरा उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे आमदार तीन वेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच भाजपचे आमदार देखील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक पक्षाकडून आपल्या आमदारांची काळजी घेतली जात आहे. सोमवारी विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) मतदान होणार आहे. आमदार काही पहिल्यांदा फाईव्ह स्टारमध्ये आलेले नाहीत. ग्रामिण भागातील आमदारांना फाईव्ह स्टार काय आणि लहान हॉटेल काय काही फरक पडत नाही. त्यांना मार्गदर्शन हा महत्वाचा हेतू आहे. प्रत्येक पक्ष आपली गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपली रचना ठरवली आहे. तसेच स्ट्रटर्जी देखील ठरलीये, जो कोटा आहे त्याबद्दल तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्यादवारांचा विजय निश्चित

शिवसेनेला राज्यसभेच्या वेळी जी मतं ठरली होती, ती देण्यात आली. जी मदत लागली ती राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे अपक्षांचा जो कोटा आहे. तो महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीच सगळेचं उमेदवार जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदारांपेक्षा नेत्यांना जे वाटतंय त्यामुळे आमदार निवडून येतील असंही ते म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय

तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. मागच्यावेळी भाजपचा स्टॅटेस्टिक पद्धतीने आणि आमच्या दुर्लक्षपणामुळे विजय झाला. पण यावेळी तसं होणार नाही. सध्या भाजपाकडे कोटा नाही. त्यांचेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजपच्या काही आमदारांचे पहिल्या, दुसऱ्याआणि तिसऱ्या निवडीची मतं आम्हाला मिळतील. तसेच त्यांचा पाचवा उमेदवार निवडून येणार नाही असं मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीस स्वप्नांचा विचार करत आहेत,

त्यांच्या पायाखालची वाळू घसरलीये त्यांना पराजय दिसतोय असाही टोला पाटील यांनी लगावला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.