AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुंबई महापालिकेतही महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र येणार”

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अपक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra vikas aaghadi together in BMC) स्थापन केली आहे.

मुंबई महापालिकेतही महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र येणार
| Edited By: | Updated on: Nov 27, 2019 | 5:51 PM
Share

मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अपक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra vikas aaghadi together in BMC) स्थापन केली आहे. ही आघाडी राज्यात सत्तास्थापन करणार असल्याचेही निश्चित झाले आहे. त्यासोबतच आता मुंबई महापालिकेतीलही सत्ता समिकरणे बदलली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra vikas aaghadi together in BMC) मुंबई महापालिकेतही एकत्र काम करणार, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

“महानगरपालिकेत शहराच्या विकासाची कामं केली जातात. महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले जात आहे. शहरांच्या विकासासाठीही महापालिकेत आम्ही एकत्र काम करु”, असं काँग्रेसचे ज्येष्ठे नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी एप्रिल महिन्यात होणार्‍या समित्यांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना सामावून घेत त्यांना दोन वैधानिक, दोन प्रभाग आणि दोन विशेष समित्या देणार असल्याचे सांगितलं जात आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

मंत्रिमंडळाचं संभाव्य वाटप

शिवसेना –

11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री + 1 मुख्यमंत्री – एकूण 16

राष्ट्रवादी –

11 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 4 राज्यमंत्री – एकूण 15

काँग्रेस –

9 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 3 राज्यमंत्री – एकूण 12 + विधानसभा अध्यक्षपद

  • गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता (राष्ट्रवादी)
  • महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता (काँग्रेस)
  • नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता (शिवसेना)
  • ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.