AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या (EVM not working) तक्रारी आहेत. 

Maharashtra Voting LIVE | कुठे कुठे EVM मध्ये बिघाड?
ईव्हीएम
| Edited By: | Updated on: Oct 21, 2019 | 6:11 PM
Share

EVM not working मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या (EVM not working) तक्रारी आहेत.  अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा (Maharashtra Vidhansabha Election Voting)  हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, मतदान सुरु झालं असलं, तरी सुरुवातीपासूनच ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी सुरु आहेत. ईव्हीएममध्ये अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे काही ठिकाणी उशिरा मतदान सुरु झालं, तर काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे मतदानाला व्यत्यय आला.

VOTING LIVE UPDATE

[svt-event title=”निफाड विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड” date=”21/10/2019,6:11PM” class=”svt-cd-green” ] निफाड विधानसभा मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड, वैनतेय महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 174 येथील घटना, ईव्हीएम चालू न झाल्याने 1 तासाहून अधिक वेळ मतदान बंद, पर्यायी मशीन आणून मतदानाला सुरुवात, मतदानासाठी मोठी गर्दी [/svt-event]

[svt-event title=”जालन्यातील बदनापूर मतदारसंघात व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड” date=”21/10/2019,6:09PM” class=”svt-cd-green” ] जालन्यातील बदनापूर मतदारसंघात व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड, दहिगव्हान खुर्द येथील घटना, सायंकाळी साडेचार वाजता बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया थांबली, मतदान केंद्रावर गर्दी [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत मतदान यंत्रात बिघाड” date=”21/10/2019,12:26PM” class=”svt-cd-green” ] गंगापूर तालुक्यातील घोडेगाव इथे मतदान यंत्रात बिघाड मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प गेल्या एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प [/svt-event]

[svt-event title=”मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 % टक्के मतदान..” date=”21/10/2019,12:02PM” class=”svt-cd-green” ] मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 % टक्के मतदान.. [/svt-event]

[svt-event title=”बुलडाणा जिल्हा सकाळी 11 वाजेदरम्यान मतदान” date=”21/10/2019,11:55AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा जिल्हा सकाळी 11 वाजेदरम्यान आकडेवारी 21 मलकापूर – 14.78 22 बुलडाणा – 15.15 23 चिखली – 15.30 24 सिंदखेड राजा – 16.41 25 मेहकर – 16.05 26 खामगांव- 17.98 27 जळगांव जामोद – 15.71 एकूण – 15.91 [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या EVM बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी ” date=”21/10/2019,11:48AM” class=”svt-cd-green” ] राज्याच्या विविध भागातून EVM बिघाडाच्या तक्रारी, काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे EVM बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी केल्या [/svt-event]

[svt-event title=”चाळीसगावात ईव्हीएम बंद” date=”21/10/2019,10:51AM” class=”svt-cd-green” ] चाळीसगावात ईव्हीएम बंद, सकाळपासून ईव्हीएम बंदची दुसरी घटना, मतदान केंद्र क्र 310 वलठान येथील घटना [/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यातील देऊळगावात तासभर उशिराने मतदान” date=”21/10/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] सिंदखेड राजा मतदारसंघातीळ देऊळगांव राजा बुथ क्र. 205 मध्ये मतदान सुरू होण्यापूर्वीच बिघाड झाला होता, त्यामुळे तासाभराने मतदान सुरु झाले. येथील मशीन १ तास ४ मिनिटे बंद होती. ८ वाजून ४ मिनिटांनी सुरू झाले मतदान. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत 3 मतदान केंद्रावर बिघाड ” date=”21/10/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात तीन मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड,पैठण तालुक्यातील टाकळी अंबड, वाहेगाव आणि वैजापूर तालुक्यातील हिंगोणी मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड, जवळपास एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प,तीन मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने प्रक्रिया ठप्प [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजीत VVPAT मध्ये बिघाड” date=”21/10/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील घटना, रुकडी गावातील बूथ क्रमांक 219 मध्ये VVPAT मशीन बंद असल्यामुळे तासाभरापासून मतदान बंद. पावसामुळे हैराण झालेल्या मतदार राजावर परिणाम, त्यामध्ये मतदानाची मशीन बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ [/svt-event]

पुण्यातील शिवाजी नगरमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान

पुणे शिवाजीनगर विद्याभवन मतदारकेंद्रावर बत्ती गुल, मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु

सांगलीतील इस्लामपूरमध्ये मतदानयंत्रात बिघाड 

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रात बिघाड, इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक 63 वर मतदान यंत्रात बिघाड, 35 मिनिटे उलटूनही मतदान सुरु नाही

वर्ध्यात ईव्हीएममध्ये बिघाड

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील मतदान केंद्रावर १ तासापासून ईव्हीएम मशिन बंद.  मोहगाव येथील बुथ क्रमांक 50 वरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, मतदारांची मतदान केंद्राबाहेर लागली रांग, मतदान मशीन बदलण्यासाठी चमू रवाना. हिंगणघाट मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी सहा मशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड. सहाही मशीन बदलण्यात आल्यात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.