AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदूरबारमध्ये सुप्रिया गावित तर धुळ्यात धरती देवरे विजयी, भाजप नेत्यांच्या लेकींची ZP मध्ये दिमाखात एंट्री

Maharashtra zp election results 2021: धुळे जिल्ह्यात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी झाल्या आहेत. तर, नंदुरबारमध्ये हिना गावित यांची बहिण सुप्रिया गावित विजयी झाल्या आहेत.

नंदूरबारमध्ये सुप्रिया गावित तर धुळ्यात धरती देवरे विजयी, भाजप नेत्यांच्या लेकींची ZP मध्ये दिमाखात एंट्री
धरती देवरे सुप्रिया गावित
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 11:18 AM
Share

मुंबई: नंदूरबारमध्ये मंत्री के. सी. पाडवी, भाजप खासदार हिना गावित, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित या कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. तर, धुळे जिल्ह्यात गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

सुप्रिया गावित यांनी विजयानंतर विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली असल्याची भावना व्यक्त केली. माझी जबाबदारी आणखी वाढली, माझी लहान बहीण जिंकली, मतदारसंघाचा विकास करताना या भागाचा विकास जबाबदारी आहे. सगळ्यांच्या मतदारसंघातील विकास मला जोमाने करावा लागणार आहे, मागच्या निवडणुकीत 11 पैकी 7जिंकून आले, यावेळी तो आकडा क्रॉस करु, असं खासदार हिना गावित म्हणाल्या आहेत. विजयकुमार गावित यांनी या जिल्ह्यात आम्ही विकास करतोय, त्यामुळे जनतेचा विश्वास आहे. जिल्हा परिषदेत सर्व 5 आणि पंचायत समितीतही 5 उमेदवार निवडून येतील, असं म्हटलं आहे.

धुळ्यात धरती देवरे विजयी

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. धुळे जिल्ह्यात गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता 1 जागेची आवश्यकता आहे.

नंदूरबारमध्ये दिग्गजांनी गड राखला

भाजपा नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून उमेदवारी देण्यात आली होती त्या विजयी झाल्या आहेत. तर त्या सोबत डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहिणीला खापर गटातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती त्या विजयी झाल्या आहेत. त्यासबत शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. यांच्या लढतीकडं नंदुरबारचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

Dhule ZP Election Result : धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दिमाखात विजय, भाजपला अवघ्या एका जागेची गरज

Maharashtra zp panchayat samiti election results 2021 live counting updates Hina Gavit sister Supriya Gavit and Dhule Dharati Devare won election

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.