
महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजलं. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अवघ्या महिन्याभरात महाराष्ट्रात नवं सरकार येणार आहे. त्यामुळे कुणाची सत्ता येईल हे मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी आहे. मात्र, राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे आहे. 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्व काही बदललं आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळालं होतं. पण युती तुटली. ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण त्यापूर्वी निकाल लागल्यावर काही दिवसातच अजित पवार यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. पण हे सरकार औटघटकेचं ठरलं. शरद पवार यांनी हे बंड मोडून काढलं. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार आलं. पण दोन वर्षात शिवसेनेत फूट पडली. एकनाथ...