कोठेंचा पक्षप्रवेश लटकला, कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीत

| Updated on: Jan 08, 2021 | 4:46 PM

शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश करण्यात आला आहे. (Mahesh Kothe NCP entry postpone) 

कोठेंचा पक्षप्रवेश लटकला, कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीत
Follow us on

सोलापूर : शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अखेर महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश लांबणीवर पडला आहे. मात्र महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (Mahesh Kothe NCP entry postpone) 

सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. कोठे यांचा आज शुक्रवार (8 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार होता. मात्र शिवसेनेच्या सूचनेनंतर महेश कोठे यांचा पक्षप्रवेश थांबण्यात आला आहे. पण तरी महेश कोठे यांचे निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कोठे यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.

पक्षप्रवेश केलेल्या समर्थकांची नावे

  • रियाज मुमिन
  • राज महेंद्र कमकम – माजी नगरसेवक
  • युवराज चुंबडकर
  • सलाम शेख
  • युवराज सर्वडे
  • नितीन करवा
  • शाम पांचारिया
  • बाजू जमादार
  • परशुराम भिसे

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महविकासविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे एकत्र सत्तेत असून अंतर्गत पक्ष प्रवेश होत राहिले. तर त्याचा वाईट संदेश जनतेत जाईल. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून असे पक्षप्रवेश रोखण्यात यावे, अशी सूचना शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती.

त्यामुळे महेश कोठे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेला आहे. पण त्यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगसेवक आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे यांच्या प्रवेशाला दुजोरा दिला आहे. (Mahesh Kothe NCP entry postpone) 

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंची पहिली कठोर कारवाई, महेश कोठेंची कायमची हकालपट्टी

शिवसेनेच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती; आता उद्धव ठाकरे काय करणार?