मुलीच्या मांडव टहाळीतील डान्स महागात, भाजप आमदार महेश लांडगेंसह 60 जणांवर गुन्हा

| Updated on: May 31, 2021 | 5:10 PM

भाजप आमदार महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेशं लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुलीच्या मांडव टहाळीतील डान्स महागात, भाजप आमदार महेश लांडगेंसह 60 जणांवर गुन्हा
भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल
Follow us on

पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेशं लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. (Crime registered against 60 people including BJP MLA Mahesh Landage)

कोरोना नियमांच्या पायमल्लीवरुन टीका

दरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागलं होतं.

महापालिका अधिकाऱ्याचाही डान्स व्हिडीओ

आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत. आमदारांच्या कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत इतरांनीही नृत्य केलं. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार आणि अधिकारी दोघांवर आता टीकेची झोड उठत आहे.

कोण आहेत महेश लांडगे?

महेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष
भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात
2017 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश
राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: पुण्यातील सरसकट सर्व दुकानं उघडण्यास परवानगी मिळणार?

Video | अंगणात पडली वीज, लोकांना विजेचे झटके, नारळाच्या झाडानेही पेट घेतला, घटना कॅमेऱ्यात कैद

Crime registered against 60 people including BJP MLA Mahesh Landage