आनंद महिंद्रांकडून राजकीय परिस्थितीवरील गमतीदार व्हिडीओ ट्वीट

महाराष्ट्रातील राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ (Aanand mahindra tweet video on maharashtra politics) दिली.

Aanand mahindra tweet video on maharashtra politics, आनंद महिंद्रांकडून राजकीय परिस्थितीवरील गमतीदार व्हिडीओ ट्वीट

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ (Aanand mahindra tweet video on maharashtra politics) दिली. त्यासोबतच एनसीपी नेते अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

महाराष्ट्रातील या सर्व राजकीय भूकंपानंतर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Aanand mahindra tweet video on maharashtra politics) यांनी ट्विटरवर एक गमतीदार असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामधून त्यांनी राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली आहे. व्हिडीओमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती दिसत आहे.

व्हिडीओमध्ये मुलांच्या दोन गटात कबड्डी स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या गटातील प्रतिस्पर्ध्याला बाद करुन रेडरच्या मधल्या रेषेला स्पर्श करण्याआधीच प्रतिस्पर्धकांनी त्याला खेचले आणि बाद केले.

“कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही. कारण अपयश हे यशात बदलण्याची शक्यता असते”, असं या व्हिडीओसोबत महिंद्रा यांनी म्हटले आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबरला हा कबड्डी स्पर्धेचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. तो व्हिडीओ त्यांनी काल रीट्वीट केला.

महिंद्रा यांच्या ट्वीटला आठ तासात 2.3 हजार लाईक मिळाले आहेत आणि या ट्वीटला 12.7 हजार वेळा रीट्वीटही केले आहे.

या ट्वीटखाली एका यूजर्सने म्हटले की, “अतीआत्मविश्वासी रेडर दुसरा कुणी नसून फक्त संजय राऊत आहे”. तर एकाने लिहले की, “अमित शाह आणि शरद पवारांनी लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे उद्धव ठाकरे रनआऊट झाले आहेत”, असंही एका यूजर्सने म्हटले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *