2018 स्पेशल : नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस-शिवसेना युती गाजली

नंदुरबार : 2018 हे वर्ष नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणातील महत्त्वाचं वर्ष ठरलं. या वर्षात जिल्ह्यात तीन पालिकांची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने दोन पालिकांवर विजय मिळवला. त्याचसोबत अनेक युती आणि आघाडी चर्चेचा विषय ठरल्या. राजकीय पक्षाचे अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेस आणि भाजपा मुख्य विरोधी असले तरी नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना युती …

, 2018 स्पेशल : नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस-शिवसेना युती गाजली

नंदुरबार : 2018 हे वर्ष नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणातील महत्त्वाचं वर्ष ठरलं. या वर्षात जिल्ह्यात तीन पालिकांची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने दोन पालिकांवर विजय मिळवला. त्याचसोबत अनेक युती आणि आघाडी चर्चेचा विषय ठरल्या. राजकीय पक्षाचे अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत.

जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेस आणि भाजपा मुख्य विरोधी असले तरी नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना युती पाहण्यास मिळाली होती. या युतीला चांगलं यशही मिळालं. 39 सदस्य असलेल्या नगरपालिकेत काँग्रेसने शिवसेनेला पाच जागा दिल्या होत्या. त्यापैकी चार नगरसेवक विजयी झाले. तर काँग्रेसचे 26 नगरसेवक विजयी झाले. एकूणच काँग्रेस-शिवसेना युती एक वेगळं उदाहरण ठरली. वाचा2018 स्पेशल : दानवेंच्या जावयाचा पुन्हा ‘स्वगृही’ परतण्याचा प्लॅन फसला!

नंदूरबार जिल्हा परिषदेची मुदत संपली आहे. मात्र निवडणुकीची तयारी होत असताना आरक्षणाच्या मुद्यावर निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्याची धडपड सुरू केली. मात्र अखेर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यकाळाला एक वर्षांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय काँग्रेसच्या ताब्यात राहणार आहे.

नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत टॉप 10 खासदार माणिकराव गावित यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या गावित परिवाराने हिना गावित यांना खासदार म्हणून निवडून आणलं. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात लोकसभा जागेची मागणी करण्यात आली. त्यामुळे डॉ. विजय कुमार गवितांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली. मात्र त्यांनी त्याचं खंडन केलं. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाच्या भरवशावर मागण्यात आली हा एक प्रश्न आहे. वाचा – 2018 स्पेशल : बारामतीत पवारांची ताकद आणखी वाढली

एकीकडे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपामध्ये नंदुरबार जिल्ह्यात अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तळोद्याचे आमदार उदयसिंग पाडवी आणि खासदार यांच्यात अंतर्गत कुरबुरी अनेक वेळा उघड झाल्याने त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *