2018 स्पेशल : दानवेंच्या जावयाचा पुन्हा ‘स्वगृही’ परतण्याचा प्लॅन फसला!

2018 स्पेशल : दानवेंच्या जावयाचा पुन्हा 'स्वगृही' परतण्याचा प्लॅन फसला!

औरंगाबाद : 2018 या वर्षात स्थानिक पातळीपासून ते अगदी देश पातळीवर अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यांनी पुढील समीकरणं बदलली. टीव्ही 9 मराठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय घडामोड देण्याचा प्रयत्न करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही अशा अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्याचा स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीवर परिणाम जाणवला. पण सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

औरंगाबाद : 2018 या वर्षात स्थानिक पातळीपासून ते अगदी देश पातळीवर अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यांनी पुढील समीकरणं बदलली. टीव्ही 9 मराठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय घडामोड देण्याचा प्रयत्न करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही अशा अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्याचा स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीवर परिणाम जाणवला. पण सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे जावई आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची.

हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या नवीन पक्षाची स्थापना केली. दसऱ्याच्या मुहूर्तावर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा केली होती. शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन करून आगामी काळात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी केला.

शिवसेनेत असून देखील खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सोबत मतभेद निर्माण झाले. त्यात शिवसेनेचे आमदार असूनही हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड नगरपालिका निवडणुकीत स्वतःचं वेगळं पॅनल उभं केलं. एक नाही, अनेक वेळा हर्षवर्धन यांनी पक्षविरोधी कृत्य केलं. त्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची शिफारस स्थानिक शिवसैनिकांची होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळणार नाही याची प्रचिती हर्षवर्धन यांना होती.

काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षात जाण्याची इच्छा हर्षवर्धन यांची होती. अनेक कार्यक्रमात ते काँग्रेस नेत्यांसोबत दिसले. मात्र काँग्रेस पक्षात स्थान मिळणार नसल्याने अत्यवस्थ असलेले हर्षवर्धन भाजपात जातील अशी शक्यता होती. मात्र हे रावसाहेब दानवे यांना अवघड जागेचं दुखणं झालं असतं. म्हणून त्यांना रस्ते अवघड करून दिल्याची देखील चर्चा आहे.

त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी आपला पक्ष स्थापन करत स्वतःची वेगळी चूल मांडली. त्यांनी कार्यालयाची सुरुवात केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी याआधी केली आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें