AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! भाजपा आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळही केली; प्रकरण काय?

भाजपा आमदाराच्या घरात या आरोपीने तीन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! भाजपा आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळही केली; प्रकरण काय?
bhimrao tapkir
| Updated on: May 29, 2025 | 9:32 PM
Share

पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता. आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

तीन वेळा घरात घुसण्याचा प्रयत्न

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी शंकर धुमाळ हा वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. सतत होणाऱ्या या प्रकारामुळे आमदार व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

शंकर धुमाळला अटक

दरम्यान सुरुवातीला आमदारांच्या वतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शंकर धुमाळ याला अटक केली.

वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

आरोपी शंकर धुमाळ याच्या विरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1) भारतीय दंड संहिता कलम 352 (उपद्रव करणे), 351(2)(3) (आक्रमणाची धमकी), 132 (सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला), 333 (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकाला दुखापत करणे), पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, 1922 अंतर्गत कलम 3 या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करत त्याला बुधवारी अटक केली.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?