लोकसभा सोडली, पण विधानसभेसाठी 288 मतदार संघात उमेदवार… मनोज जरांगे यांची घोषणा

majoj janrage on vidhan sabha election: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे जारंगे पाटील आले. आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आले.

लोकसभा सोडली, पण विधानसभेसाठी 288 मतदार संघात उमेदवार... मनोज जरांगे यांची घोषणा
manoj jarange
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 12:23 PM

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाहीत. आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणाला उभे केले आहे, कोणाला पाडा हे देखील मी सांगितले नाही. पण त्याचा गैर अर्थ काढू नये. मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही एकपण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही. परंतु विधानसभेसाठी सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

विधानसभा लढवणार

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे जारंगे पाटील आले. आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभेला उमेदवार दिले नाही मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला 288 मतदार संघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.

प्रत्येकाने मतदान करावे- मनोज जरांगे

मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे. जो उमेदवार सगे-सोयऱ्याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे, कोणाला मतदान करायचे आहे. आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. वंचित आघाडीसोबत लोकसभा लढवण्याबाबत त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना युतीचा प्रस्ताव समोर ठेवला होता. परंतु मराठा समाजाने हा प्रस्ताव नाकारला. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.