Manoj Jarange Patil: फडणवीस तरी माझं काय वाकडं करणार? मनोज जरांगे पाटील यांचे विधान चर्चेत

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Manoj Jarange Patil: फडणवीस तरी माझं काय वाकडं करणार? मनोज जरांगे पाटील यांचे विधान चर्चेत
Devendra Fadnavis and manoj Jarange
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 1:22 PM

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी आज पासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, परभणी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली. त्यानंतर, मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

“देवेंद्र फडणवीसांचे 100 टक्के दिवस भरले आहेत”

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “चार घरी शुटिंग करुन चार पोलिसांना देता ते तरी काय करणार आहेत? काय करणार आहे फडणवीस तरी वाकडं? तुम्ही तरी किती मरमर करणार? बसा खूर्ची टाकून चहा वैगरे प्या. काय होणार ते माहिती नाही. तुमचं काम तुम्ही करा. काय होणार आहे? मी चार वेळा बोलवत आहे त्यांना. आता त्यांचे दिवस भरत आलेत. देवेंद्र फडणवीसांचे 100 टक्के दिवस भरले आहेत. लय पाप झाल्यावर तसच असतं. कोणता पोलीस सुखी आहे?”

आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

परभणी येथील शेतकरी मेळ्याव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. पण जरांगे पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यात सहभागी होऊ नये असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. ‘नांदेडचेही लोक रस्त्यावर आले, तर शिंदे हेलिकॉप्टरने थेट मुंबईला जाईल. आपण जाऊन ताकद वाया घालवायची नाही. मी हा देखील विचार करत आहे. जालन्यातून परभणीत वेळेत पोहोचणं शक्य वाटत नाही. पोलिसांचं टेन्शन घेऊ नका. परभणी नाकाबंदी केली तरी काही अडचण नाही. पोलिसांचा आणि आमचा संबंध नाही. सरकार आणि आमचा संबंध आहे.’

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी निघाल्यावर रस्त्यावर एकच गर्दी होईल. त्यांना नांदेडमध्ये जाणं अवघड होईल. आपला आणि त्यांचा सामना झाला पाहिजे. मर्दासारखा सामना झाला पाहिजे. मग काय व्हायचं ते होऊ द्या. त्यांना रक्तपात करायचं असेल, तर होऊद्या. त्यांच्या हातातून होऊ द्या. पण सामना झाला पाहिजे. सामना बरोबरीचा झाला पाहिजे. एकनाथ शिंदे समोर भेटले पाहिजे. पोलिसांची काळजी करू नका. पोलिसांचं टेन्शन करू नका. त्यांचं मी बघतो. खोटा टाइम मॅच करू नका. माझ्या समाधानासाठी वेळ देऊ नका. सामना होणे गरजेचे आहे.’

Follow Us