Manoj Jarange Patil: छगन भुजबळ दोन हाणून झोपतात; जरांगे पाटलांची सडकून टीका

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना तांदुळवाडी गावातील सांगता सभेत सरकारवर टीका केली.

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ दोन हाणून झोपतात; जरांगे पाटलांची सडकून टीका
Manoj Jarange
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 8:42 AM

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांची पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना तांदुळवाडी गावातील सांगता सभेत सरकारवर टीका केली. त्यांनी थेट छगन भुजबळ दोन हणून झोपत असेल असे म्हटले आहे.

सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सध्या सगळ्यात खुश छगन भुजबळ असेल, दोन हणून झोपत असेल. मला मंत्री नको, पक्ष नको, समाजातील लेकरांना मोठं करण्यासाठी हे आंदोलन उभं केलं. बावनकुळे तुझा आणि आमचा संबंध नव्हता. तुला हे पाऊल कुणी उचलायला लावलं? 28 ऑगस्ट पर्यंत नका, त्यानंतर पहा मग मराठे कसे घुसतात. फडणवीस यांना एक वर्ष बोललो नही. एक शब्दाने दुखावले नही. बावनकुळे यांनी मध्येच खडा टाकला आणि हे वातावरण बिघडवले. सरकारणे आपल्या विरोधात डाव रचला आणि आपल्याला हलक्यात घेतलं. मराठ्यांविषयी भयंकर प्लॅन रचला, मराठा आणि जरांगे पाटलात गैरसमज पसारावा, एकमेकापासून तोडून टाकायचा. डाव टाकणारे बावनकुळे, हडप्पा, त्याच्या पायात घुंगरू पाहिजे. आरक्षण म्हणजे सोपा विषय नाही.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इथे मराठे बाप आहे,आणि मराठेच बाप राहणार आहे. क्षत्रिय मराठ्यांच्या नादला लागायचं बंद कर -फडणवीस यांना इशारा. मराठ्यांच्या विरोधात लढायच्या आणि डाव टाकायच्या भानगडीत पडू नका. बावनकुळे आमच्या तोंडातला घास घालतो का? शहाणा होय. आम्ही मारायला भिणारी औलाद नाहीये, आम्हाला खुप संघर्ष करावा लागतोय. हरामखोरांनो तुम्हाला आम्ही एसीमध्ये बसाविले.

“आज शिंदे साहेबांचे काय हाल”

पुढे ते म्हणाले, कोण फडणवीस? कोण शिंदे? तुम्हाला मोठं करून आम्ही काही चूक केली का? आमच स्वप्न का पूर्ण होऊ देत नही? इतके वैरी का झाले? आमच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. आमचे स्वप्न धुळीस मिळत आहे. आमच्यावर अन्याय करण्याचा अधिकारी कुणी दिला? मराठ्यांच्या नेत्यांच्या नाकावर टिचून त्याने नोंदी रद्द केल्या. गप्प बसुन डोळ्या देखत वाटोळं पाहता का? जर समाज बाजूला सरकला तर तुम्हाला जगू देणार नाही. आज शिंदे साहेबांचे काय हाल आहे? सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. मी स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढतोय. मारायला सुद्धा भीत नाहीये.

29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला भेटू

मी असेल, नसेल तेव्हा तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. मी आहे तो पर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही. समाज कधीच उघडा पडू देऊ नका. यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या समाजातील लेकरांचा वनवास करायचं ठरविले. पक्ष आणि नेता आपला बाप नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. समाज संकटात असेल तर वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल. ज्या दिवशी समाज संकटात असेल तेव्हा पक्षाला लाथ मारा, सरकारने जाणूनबुजून करत आहे. मी कधीही जीव द्यायला तयार आहे, कधीही मारायला तयार आहे, तुमची कधीही एकजूट असू द्या. 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला भेट द्यायला या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us