#पुन्हानिवडणूक, कलाकारांकडून एकसारखे ट्विट, भाजपकडून वापर होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तास्थापनेचा (Marathi celebrity tweets Election again) निर्णय घेतला आहे.

#पुन्हानिवडणूक, कलाकारांकडून एकसारखे ट्विट, भाजपकडून वापर होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय तणातणी सुरु आहे. निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्तास्थापन करु न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तास्थापनेचा (Marathi celebrity tweets Election again) निर्णय घेतला आहे. एकीकडे भाजपने सरकार आपलंच येईल असा दावा केला असताना, महासेनाआघाडीवर (Marathi celebrity tweets Election again) टीका सुरु केली आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केले आहेत.

मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे.  त्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे.

एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तेची बोलणी सुरु असताना, दुसरीकडे कलाकार असे ट्विट करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कलाकारांनी आपला भाजपकडून वापर होऊ देऊ नये, असं आवाहन सचिन सांवत यांनी केलं.

ट्विटरवर टीकेचे धनी

दरम्यान, कलाकारांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. भाजपकडून पैसे घेऊन ट्विट केले आहेत का असा प्रश्न ट्विटरवर विचारले जात आहेत.

झी टॉकीजचं स्पष्टीकरण

दरम्यान, कलाकारांनी केलेले ट्विट हे झी टॉकीजवरील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमाशी संबंधित असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र झी टॉकीजने ते फेटाळून लावलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *