एनडीएबरोबर जाण्याचा 2017 मधील निर्णय मुर्खपणाचा; नितीश कुमारांची भाजपवर सडकून टीका; भाजपची पक्ष फोडणं एवढीच रणनिती

मणिपूरमधील जेडीयूच्या आमदारांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाबद्दल बोलताना त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत देशातील लोकशाहीची थट्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी भाजप केला. लोकशाही मुल्यं पायदळी तुडवली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एनडीएबरोबर जाण्याचा 2017 मधील निर्णय मुर्खपणाचा; नितीश कुमारांची भाजपवर सडकून टीका; भाजपची पक्ष फोडणं एवढीच रणनिती
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 9:53 AM

नवी दिल्लीः बिहारमधील (Bihar) राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातील घडामोडींनाही प्रचंड वेग आला आहे. बिहारमध्ये अनेक प्रकारच्या बदल घडत असतानाच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी एक खळबळजनक विधान करून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आणले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 2017 मध्ये आम्ही भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला होता, तो निर्णय मुर्खपणाचा निर्णय होता. ज्या भाजपबरोबर (BJP) आम्ही गेलो होतो, तोच भाजप पक्ष आमच्याच पक्षाची शकलं करायचा प्रयत्न करत होता हे आता समजलं असल्याची टीका त्यांनी केली. जोपर्यंत संयुक्त जनता दल हा पक्ष स्वतंत्र आहे तोपर्यंत भविष्यात कधीही भाजपबरोबर कोणताही एकत्र जाण्याचा निर्णय घेणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीही भाजपविरोधात जोरदार चर्चा झाली आहे. त्यानंतर आज नितीश कुमारांनी विरोधी पक्षातील नेत्यांबरोबर दिल्लीत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपबद्दल खळबळजनक विधानं

बिहारमधील राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपबद्दल खळबळजनक विधानं केली आहेत, त्यामुळे बिहारच्या राजकारणाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, 2017 मध्ये आमच्याकडून चूक झाल्याचे सांगत त्यांनी बैठकीत पक्षातील नेत्यांसमोर आपली चूक मान्य केली.

भाजपबरोबर जाणंच चुकीचं

यावेळी भाजपबरोबर गेल्याचे चुकीचे होते हे सांगत असतानाच त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा तो एक मुर्खपणा होता असंही त्यांनी यावेळी सांगितले. 2013 मध्येच आपण एनडीएपासून विभक्त झालो होतो, तरीही आपण पुन्हा एकदा 2017 मध्ये आम्ही पुन्हा एनडीएमध्ये सामील झालो, त्यामुळे आपल्याच राज्यातील काही मित्रपक्ष लांब गेल्याचेही त्यांनी कबूल केले आहे.

आमच्या निर्णयाचे लोकांकडून स्वागत

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या बैठकीत भाजपवर सडकून टीका करत एनडीएमधून आपण बाहेर पडून स्वतंत्र निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचे स्वागत लोकांमधूनही होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या भाजपसोबत आम्ही 2017 मध्ये गेलो होतो, तोच भाजप पक्ष आमच्या संयुक्त जनता दल फोडण्याच्या मार्गावर लागला होता, पक्ष फोडण्याची त्यांची रणनिती असली तरी ही गोष्ट आम्हाल उशीरा लक्षात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जोपर्यंत संयुक्त जनता दल आहे तोपर्यंत आता भविष्यात कधीही भाजपबरोबर हातमिळवणी केली जाणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिल्लीत महत्वपूर्ण बैठक

याबैठकीत त्यांनी भविष्यातील राजकारणाविषयी बोलताना सांगितले की, आता अनेक विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आपल्याला फोन येत असून आम्ही एकत्र लढलो तर भाजपचा नक्की पराभव होऊ शकतो असा विश्वासही नेते देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बिहारमधील राजकारण थंड झाले की, विरोधी पक्षांतील नेत्यांबरोबर दिल्लीत महत्वाची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा दिला तर भाजपला देशात कोणतेही भवितव्य नाही, मात्र विरोध पक्ष जर एकत्र येत नसतील तर मात्र त्याचा फायदा भाजप पक्षालला होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले.

नितीश कुमार आज दिल्लीत

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा आज दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की, 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत महाआघाडीतील चारही पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असून यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपवर टीका करताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयींची आठवण काढत आज केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे नेते त्यांचे नावही घेत नाहीत अशीही त्यांच्यावर टीका केली आहे.

देश का प्रधानमंत्री कैसा हो…

नितीश कुमारांनी बोलवलेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी नितीश कुमार यांच्या नावाच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. देश का प्रधानमंत्री कैसा हो…नीतीश कुमार जैसा हो’ अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले होते.

लोकशाही मुल्यांची थट्टा

मणिपूरमधील जेडीयूच्या आमदारांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाबद्दल बोलताना त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत देशातील लोकशाहीची थट्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी भाजप केला. लोकशाही मुल्यं पायदळी तुडवली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षांतून एकजूट राहिली तरी वेगळा आणि चांगला निर्णय होऊ शकतो, त्यामुळे विरोधकांची एकत्र मूठ बांधली गेली तर मात्र 2024 च्या निवडणुकीत भाजपला आम्ही नक्की धडा शिकवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....