मनमानी सहन करणार नाही, आम्ही भाडेकरु नाही, भागीदार आहोत : ओवेसी

| Updated on: Jun 01, 2019 | 12:10 PM

नवी दिल्ली : एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “हिंदुस्तानच्या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की 300 जागा जिंकून मनमानी करु, तर ते शक्य नाही. घटनेचा दाखल देत त्यांना मी सांगू इच्छितो की, असदुद्दीन ओवेसी तुमच्याशी लढेल, अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी लढेन.” असे असदुद्दीने ओवेसी म्हणाले. “हिंदुस्तानला एकसंध ठेवायचं आहे, […]

मनमानी सहन करणार नाही, आम्ही भाडेकरु नाही, भागीदार आहोत : ओवेसी
Follow us on

नवी दिल्ली : एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “हिंदुस्तानच्या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की 300 जागा जिंकून मनमानी करु, तर ते शक्य नाही. घटनेचा दाखल देत त्यांना मी सांगू इच्छितो की, असदुद्दीन ओवेसी तुमच्याशी लढेल, अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी लढेन.” असे असदुद्दीने ओवेसी म्हणाले.

“हिंदुस्तानला एकसंध ठेवायचं आहे, आम्ही हिंदुस्तानला एकसंध ठेवू. आम्ही तुमच्या एवढेच इथले रहिवाशी आहोत. भाडेकरु नाहीत, तर भागीदार आहोत.” असेही खासदार असदुद्दीने ओवेसी म्हणाले.

एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर सेंट्रल हॉलमधील भाषणात मोदी म्हणाले होते, “सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास. अल्पसंख्यांकाना आतापर्यंत भ्रमात ठेवलं गेलं, त्यांच्यावर अन्याय केला गेला. व्होटबँक म्हणून वापर झाला. काल्पनिक भय निर्माण केलं गेलं. त्यांचा आपल्याला विश्वास जिंकायचा आहे.”

यावर बोलताना खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “भाजपच्या 300 खासदारांमध्ये किती मुस्लीम खासदार आहेत, हे पंतप्रधान सांगू शकतील का? मोदींचं वक्तव्य आणि त्यांच्या पक्षाचे धोरण यात विसंतगी आढळते. अल्पसंख्यांक भीतीखाली असतात, याच्याशी पंतप्रधान सहमत असतील, तर त्यांना हेही माहित असायला हवं की अखलाखला कुणी मारलं.”

एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर अद्याप भाजपच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप आता ओवेसींना काय उत्तर देतं, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.