AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jaleel | मुंबई महापालिकेवर कब्जा हाच भाजपाचा अजेंडा, सत्ता आली की शिंदे गटाला सोडणार, खा. जलील म्हणतात आजच लिहून घ्या…

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर भूमिका स्वीकारतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएम पक्षावर सर्रास भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो.

Imtiaz Jaleel | मुंबई महापालिकेवर कब्जा हाच भाजपाचा अजेंडा, सत्ता आली की शिंदे गटाला सोडणार, खा. जलील म्हणतात आजच लिहून घ्या...
खा. इम्तियाज जलीलImage Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 05, 2022 | 2:07 PM
Share

नवी दिल्लीः केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिलेली आहेत. बीएमसीवर (BMC Election) सत्ता मिळवणं हाच भाजपचा या मागील हेतू आहे. एकदा मुंबई महापालिका भाजपच्या (BJP) हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरं कोणतंही मोठं आव्हान नाही. त्यानंतर शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही, हा माझा अंदाज खरा ठरणार असून तुम्ही आजच हे रेकॉर्ड करून ठेवा, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केलं आहे. भाजपावर टीका करताना खा. जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही चौफेर टीका केली आहे. यांना गरज पडते तेव्हा सेक्युलर भूमिका स्वीकारतात, असं खा. जलील म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या विषयावर झालेल्या बैठकीला खा. जलील हजर होते.

‘भाजपाला फक्त मुंबई हवीय’

भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीवर आक्रमक टीका कराताना खा. जलील म्हणाले, भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणे, हाच त्यांचा उद्देश आहे. एकदा का मुंबईवर कब्जा झाला की ते कोणाला कुठे सोडून देतील माहिती नाही. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. मुंबई महापालिका भाजपला मिळवायची आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावलीत. आणि त्यात भाजपा यश मिळालं आहे.

औरंगाबादेत पुढचा महापौर MIM चा

औरंगाबाद महापालिकेत पुढचा महापौर एमआयएमचाच होणार, असं मोठं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. राजकीय स्वार्थापोटी शहराचं नामांतर करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे मुस्लिम जनता नाराज आहे. शहरातील मुस्लिम लोक औरंगजेबाला फॉलो करत नाहीत, पण तो इतिहासाचा एक भाग आहे. तो मिटवता येणार नाही. शहरात काही सुविधा नसताना फक्त श्रेय लाटण्यासाठी नाव बदलण्याचा घाट घातला जातोय, याला जनता उत्तर देणारच असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.

‘गरज पडली की सेक्युलर होतात’

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर भूमिका स्वीकारतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएम पक्षावर सर्रास भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मात्र आता मुस्लिमांचा मोठा व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेलाय, असं वक्तव्य त्यांनी केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं म्हणून मी आलो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहितीही खा. जलील यांनी दिली.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!