Eknath Shinde : शिवसेना फुटणार? नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे 11 समर्थक आमदारांसह सुरतमध्ये

नाराज असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अखेर एकनाथ शिंदे यांचा ठावठिकाणा लागलाय. एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये (Gujarat) असल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde : शिवसेना फुटणार? नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे 11 समर्थक आमदारांसह सुरतमध्ये
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 8:44 AM

मुंबई : नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अखेर एकनाथ शिंदे यांचा ठावठिकाणा लागलाय. एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये (Gujarat) असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरामधील सूरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये (Grand bhagwati hotel) असल्याची माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. ज्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत, तिथल्या हॉटेल व्यवस्थापनाशीही टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधला. त्यावेळी नुकतेच ते हॉटेलच्या बाहेर गेल्याची माहिती हॉटेलकडून देण्यात आली.

ग्रॅन्ड भगवती हॉटेलचं नाव बदललं

ग्रॅन्ड भगवती हॉटेलचं नाव नुकतंच बदलून आता ली मेरिडिअन असं करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सोबत असल्याची माहिती कळतेय. एकनाथ शिंदे नाराज असल्याचा कारणामुळे रात्रभर बैठकांचं सत्र सुरु आहे. मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये

गुजरातमधील टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी हरीश गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरामध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. सुरत एअरपोर्टपासून दोन मिनिटांवर हे हॉटेल आहे. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती लोक आहेत, तो आकडा स्पष्ट झालेला नाही. अकरा आमदार एकनाथ शिंदेंसबोत असल्याची शक्यता आहे.या हॉटेलबाहेरचोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसंच कोणत्याही माध्यमकर्मींना जाण्यात मज्जाव करण्यात आला आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचं :

एकनाथ शिंदे पक्षासह सगळ्यांसाठी नॉट रिचेबल एकनाथ शिंदे कुणाचाही फोन घेत नसल्याची सूत्रांची माहिती एकनाथ शिंदे गुजरातच्या सूरतमधील हॉटेलात हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही सोबत असल्याची माहिती

विधान परिषद निवडणूक निकाल : मतांचं गणित

– शिवसेना :

शिवसेनेचे एकूण आमदार – 55

सहयोगी छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून – 64

पडलेली मतं – 52

शिवसेनेची किती मतं फुटली – 12

– काँग्रेस :

काँग्रेसचे एकूण आमदार – 44

काँग्रेससोबत अपक्ष आमदार – 4

काँग्रेसकडे एकूण मतं – 48

काँग्रेसला फडलेली मतं – 42

काँग्रेसची किती मतं फुटली – 6

– भाजप :

भाजपचे एकूण आमदार – 106

भाजपसोबत एकूण अपक्ष आमदार – 7

भाजपकडे एकूण मतं – 113

भाजपला पडलेली मतं – 134 (एक मत बाद)

भाजपला संख्याबळापेक्षा 21 मतं अधिक मिळाली

– राष्ट्रवादी काँग्रेस :

राष्ट्रवादीचे एकूण आमदार – 51

(दोन आमदार तुरुंगात असल्याने मतदान करता आले नाही)

राष्ट्रवादीला मिळालेली मतं – 57

राष्ट्रवादीला संख्याबळापेक्षा 6 मतं अधिक मिळाली

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.