बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांचं दालनं उभी करणार : धनंजय मुंडे

| Updated on: Feb 21, 2021 | 9:33 AM

सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभे करण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. | Dhananjay Munde

बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांचं दालनं उभी करणार : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Follow us on

सांगली : सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभे करण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते सांगलीच्या इस्लामपुरात बोलत होते. (Minister Dhananjay Munde Speech over BARTI In Sangali)

जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभी करण्याचा मानस

इस्लामपुरात धनंजय मुंडे यांच्या हस्ते 35 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूर यांच्यावतीने संस्थेच्या यशवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभे करण्याचा मानस धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला.

बार्टीच्या माध्यमातून मोठं काम उभं करणार

याप्रसंगी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले ,आपल्यावर सामजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे. या विभागाच्या बार्टीच्या माध्यमातून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा क्लास हे ऑनलाईन घेण्याच्या  प्रयत्न केला. त्यामुळे देशाच्या सेवेसाठी यशस्वी स्पर्धक देणाऱ्या चांगल्या संस्थांना सोबत घेऊन बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्राचे दालन उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल,असा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

समाजातला तळागाळातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे

सामाजिक न्याय विभागासारखं खातं मला मिळालं आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं हे खातं आहे. या खात्याच्या माध्यमातून तळागाळातला विद्यार्थी मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि अधिकारीपदावर स्थानापन्न झाला पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

(Minister Dhananjay Munde Speech over BARTI In Sangali)

हे ही वाचा :

पुण्यात कोरोना संसर्ग वाढतोय, प्रशासनाची तयारी काय ?, जाणून घ्या सध्याची परिस्थिती

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर